शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

आरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 7:08 PM

आदित्य ठाकरेंच्या उत्तरामुळे स्थानिकांचा संताप

पालघर: आरे तील मेट्रो कारशेड वरून सरकारला नाणारसारखे झुकवू असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर डहाणूच्या वाढवण बंदरासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारल्यावर "नंतर बघू" असे वक्तव्य केल्याने डहाणूतील जनतेने संताप व्यक्त केला आहे. आदित्य यांच्या वक्तव्याचा वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीसह प्राधिकरण बचाव संघर्ष समितीने निषेध केला आहे. काहींनी तर आदित्य ठाकरेंना ट्विट करून आम्ही तुम्हाला आशीर्वाददेखील निवडणुकीनंतर देऊ असे सुनावले आहे.युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडला तीव्र विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरेंनीदेखील नाणार जे झालं, तेच आरेचं होणार, असा इशारा देत आरेतील कारशेडविरोधात भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारणीच्या भाजप सरकारच्या हालचाली सुरू झाल्या असतानाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळेच जनसेवा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना वाढवण बंदराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नंतर बघू असे उत्तर आदित्य यांनी दिले. त्यांच्या या उत्तराचे डहाणूसह सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटले आहेत. पालघर विधानसभेचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारादरम्यान चिंचणी येथे झालेल्या एका जाहीर सभेत वाढवण बंदराला शिवसेनेचा पूर्ण विरोध असेल, असे जाहीर वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले होते. लोकांचा विरोध असेल, तर हे बंदर शिवसेना कदापि होऊ देणार नाही. या बंदराविरोधातील आंदोलनात माझे सर्व शिवसैनिक सहभागी होतील, असेदेखील त्यांनी जाहीर केले होते. या वक्तव्यावर विश्वास ठेवून पालघर विधानसभा मतदार संघातील किनारपट्टीवरील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपली मते टाकून आमदार अमित घोडा याला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते.भाजपकडून वाढवण बंदर उभारणीसाठी संरक्षण कवच ठरलेले डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणच बरखास्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आक्षेप घेणार आहे. हे प्राधिकरण हटवल्यास आपोआपच वाढवण बंदराचा मार्ग मोकळा होईल, असे वाढवण बंदर संघर्ष समितीचे म्हणणे आहे. अशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवणवासीयांना दिलेल्या शब्दाप्रमाणे बंदराच्या आणि संरक्षण प्राधिकरण हटविण्याविरोधात सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा दर्शवावा अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत. मात्र आदित्य ठाकरेंच्या विधानाने स्थानिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAarey ColoneyआरेMetroमेट्रो