शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

दिवा शहरवासीयांना ‘अच्छे दिन’ येणार तरी कधी? सुविधांच्या नावाने बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:10 AM

स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते चांगले असावे, चांगल्या शहरात असले पाहिजे, असे वाटत असते. पण, आपल्या बजेटमध्ये घर हवे, यासाठी दिव्यात नागरिक राहण्याकरिता येऊ लागले. येथे सुविधांची सोय नसतानाही निव्वळ गरज म्हणून नागरिक राहत आहेत.

- पंकज रोडेकरफार वर्षांपूर्वी दिवा म्हणजे गावठी दारू तयार करणाºयांचे शहर म्हणून ओळखले जात होते. टायरची ट्यूब, फुग्यात दारू भरून लोकलमधून वाहतूक केली जायची. त्यामुळे लोकलमधून प्रवासी फार कमी उतरत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गरीब, सामान्यांना ‘परवडणारी घरे’ उभी राहिल्याने लोंढा वाढला. आपले घर हे बेकायदा माहीत असूनही तेथे नागरिक वास्तव्याला आले. काही बांधकामांवर कारवाई झाली. मात्र, आजही बांधकामे जोरात सुरू आहेत. नागरी वस्ती वाढूनही ठाणे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दिव्यात नागरी सुविधांच्या नावाने अद्याप अंधारच आहे, असे म्हणावे लागेल.येथील नागरिक कर भरत असतानाही दिवा गावात पायाभूत सुविधांची बाराखडीच गिरवली जात आहे. स्मार्ट सिटीसाठी आगेकूच करणाºया ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यात समस्यांचे आगारच आहे. राज्यातील सर्वाधिक तिसºया-चौथ्या क्र मांकावरील बजेट इतके असलेल्या महापालिकेतील हे अनोखे गाव अशी दिव्याची ओळख निर्माण झाली, असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. या गावाची लोकसंख्या सुमारे साडेचार लाखांच्या घरात किंवा त्यापेक्षा अधिक असली तरीही दिव्यात ना चालण्यासाठी धड रस्ते, ना पिण्याचे पुरेसे पाणी, आरोग्यबाबत न बोललेलेच बरे, (महापालिकेचे एकही आरोग्य केंद्र नाही) रस्ते नसल्याने ना वाहतुकीसाठी बस ना धड अधिकृत रिक्षा.या समस्या कमी म्हणून भरीसभर शहरात जमा होणारा सर्व कचरा येथे आणून टाकला जात असल्याने दुर्गंधीनेही आता उच्चांक गाठला आहे. त्यातच, कच्च्या रस्त्यांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. ही बाब नुकतीच महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रदूषणाच्या अहवालात नमूद केली आहे. दिव्यातील हवेत विषारी वायू आणि धुळीचे कण प्रचंड वाढल्याने हवेची पातळी घातक झाल्याचा उल्लेख आहे.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी चक्क दिव्यात जाहीर सभा घेतली होती. मोठ्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांनी पाऊस पाडत विकासगंगा आणण्याची ग्वाही दिली. निवडणुकीनंतर सत्तेत बसलेल्या भाजपाला दिव्याच्या समस्या सोडवण्यासाठी विरोधी भूमिका घ्यावी लागत आहे. मनसेनेही अध्यक्ष राज ठाकरे यांना दिव्याचे दर्शन घडवत दिव्याखाली अंधार असल्याचे निदर्शनास आणून दिले. ठाकरे यांना दिव्यात आणून मराठी मतांवर डोळा ठेवत मनसेच्या कार्यकर्त्यांनी डम्पिंगचा मुद्दा हाती घेतला. परंतु, निवडणुकीनंतर मनसेनेही दिव्याला जवळपास रामराम केल्याचे वास्तव आहे.याआधीच्या पालिका निवडणुकीत दिव्यातील मतदारांनी मनसेच्या दोघांना निवडून दिले होते. पण, या वेळी नागरिकांनी येथील विकास डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेच्या तब्बल आठ नगरसेवकांना निवडून दिले. त्यामुळे दिव्याला कुठे पहिल्यांदा उपमहापौरपद बहाल करत न्याय मिळाला, असे वाटले. परंतु, एक ते दीड वर्षाचा काळ लोटला तरी दिव्यात अजूनही विकासाचा पत्ताच नाही. दिव्यात आतातरी विकासाचा दिवा लागू दे रे देवा, अशी म्हणण्याची वेळ दिव्यातील नागरिकांवर आली आहे.झपाट्याने नागरीकरणखाडीकिनारी आगरी आणि कोळी यांची गावे अशी दिव्याची ओळख आहे. त्यातच दिवा जंक्शन झाल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा व दिवा ते पनवेल अशा गाड्या येथून सुटतात. उत्तरेकडून पश्चिम रेल्वेमार्गे येणाºया गाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते. सात ते आठ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच स्वस्तात घरे मिळण्यास सुरुवात झाली. त्यातूनच दिव्यात बांधकामे झपाट्याने होऊ लागली आणि नागरीकरण झपाट्याने झाले.रेल्वेस्थानकाबाहेर कचºयाचे दर्शनरेल्वेस्थानकातून बाहेर पाय ठेवत नाही, तोच जिकडेतिकडे फेकलेल्या कचºयामुळे अस्वच्छता नजरेस पडते. मात्र, येथे आल्यावर शहरात असतानाही एखाद्या खेडेगावात आल्याचा भास होतो. त्यामुळे गावांप्रमाणे येथेही समस्या एकेक करून पुढे येतात.पाऊस जास्त झाला काय किंवा कमी पडला काय, दिव्यात पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहेच. पाणी ही मूलभूत गरज आहे. पण, ठाणे पालिकेला दिवा शहराबाबत ती तशी वाटत नसावी. म्हणूनच, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हे चित्र पाहता दिवा खरोखरच पालिका क्षेत्रात येते का, असा प्रश्न पडतो. कारण, दिव्यात फिरताना जे काही नजरेस पडते, ते खेडेगावासारखे वाटते.पाण्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच येथे टँकर लॉबीचे चांगले फावले आहे. ५०० लीटर पाण्यासाठी नागरिक २५० रुपये तर मोठ्या टँकरसाठी १६०० रुपये मोजतात. त्यातच लोकप्रतिनिधींचे समर्थक असलेल्या परिसरात मुबलक पाणी मिळत असल्याचा आरोपही होतो. त्यातच सोसायटींना पाणी मिळावे, यासाठी दिव्यात खाजगी व्यक्तींमार्फत हजारो रुपये घेऊन जलवाहिनीची देखभाल केली जाते. काही वाहिन्या गळत असल्याने त्यामध्ये दूषित पाणी शिरते, असा नागरिकांचा आरोप आहे. दिव्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते, मग टँकर लॉबी आणि बांधकामांना कसे आणि कुठून पाणी मिळते, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच दिव्यात पाण्यासाठी पालिकेकडून अभिनव योजनाच राबवली नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.दिवा, दातिवली येथे उभारलेले दोन जलकुंभ कित्येक वर्षांपासून बंद आहेत. याकडे ना महापालिका ना लोकप्रतिनिधींचे लक्ष. यासाठी मध्यंतरी उपोषण करण्यात आले होते. जर हे जलकुंभ सुरु झाल्यास दिवाकरांची पाण्यासाठी होणारी पायपीठ नक्कीच थांबले असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.मध्यंतरी, दिव्यात स्वच्छतागृह घोटाळा समोर आला. स्वच्छतागृहासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी दिव्यासाठी आला होता. मात्र, ही निधी लाटल्याचा आरोप भाजपाने करत तक्रार केली आहे. जुन्याच स्वच्छतागृहांची डागडुजी केली असल्याने आलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न दिवावासीयांना पडला आहे.शहर विकासाबाबत नियोजन नसल्याने जिकडेतिकडे फक्त बांधकाम केल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिव्यात लहान मुलांसाठी खेळाचे एकही मैदान नाही. तर, लहानापासून ज्येष्ठांपर्यंत विरंगुळ्यासाठी साधे एक गार्डनही नाही. त्यातून सकाळी जॉगिंगसाठी जायचे कुठे, असा प्रश्न नागरिकांपुढे पडला आहे. यामुळे नागरिकांनी रिक्त असलेल्या रेल्वे फलाटांचा जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करायला सुरुवात केली आहे. तर, नानानानी पार्कसाठी आलेला लाखोंचा निधीही लाटण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.एकही पार्र्किं गची जागा नाहीच्दिव्यात वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांची संख्याही तितक ीच वाढली आहे. त्यातच भंगारातील रिक्षा रस्त्यांवर धावत असून ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. तसेच रस्ते अरुंद असल्याने वाहनचालक मिळेल तेथे गाड्या उभ्या करतात. विकासाचे कोणतेही धोरण दिव्यात राबवले गेले नसल्याने येथे अद्यापही एकही पार्किंगस्थळच नाही. त्यातच दिव्यात वाहतूक पोलीस नसल्याने कारवाईची भीती वाहनचालकांमध्ये दिसत नाही. आरटीओचे दिव्याकडे लक्ष नसल्यानेच भंगारातील रिक्षा सर्रास येथे धावतात. अवघ्या हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच अधिकृत रिक्षा येथे दिसतात.तलावाची दुरवस्थादिव्यातील स्टेशन परिसर, दातिवली, साबेगाव असे तीन तलाव आहेत. त्यातील स्टेशन परिसरातील तलाव अखेरच्या घटका मोजत आहे. अतिक्रमणामुळे तलावाचे अक्षरश: डबके झाले आहे. त्यातच आजूबाजूचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. सद्य:स्थितीत शेवाळाचे सम्राज्य पसरले आहे. मध्यंतरी दातिवली तलावासाठी सुमारे १५ लाख खर्च करून सुशोभीकरण केले होते. पण, तेथे सुशोभीकरण केल्याचे दिसत नाही. या तलावात उन्हाळ्यात नागरिक कपडे धुण्यासाठी येतात. त्यामुळे तेथे प्रदूषण होते. अशीच काही अवस्था साबे तलावाचीही आहे.फेरीवाले खाजगी जागेतकाही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी स्टेशन परिसरातील रस्ता रुंदीकरण करताना तेथील बेकायदा फेरीवाल्यांना उठवले. त्यामुळे हा रस्ता फेरीवालामुक्त झाला आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा फेरीवाले येतील अशी भीती आहे. तर, दिव्यात अधिकृत भाजी मंडई नसल्याने बेकायदा फेरीवाल्यांनी खाजगी जागेत बस्तान बसवले. पण, हे स्थलांतर महापालिका, स्थानिक राजकीय नेत्यांकडून केल्यामुळे या फेरीवाल्यांना पैसे मोजावे लागतात.आरोग्य केंद्रच नाहीप्रदूषण अहवालात दिव्यातील हवेने घातक पातळी ओलांडली आहे, असा शेरा मारला आहे. त्यातच, दिवा गॅस चेंबरवर असल्याने येथून वायुप्रदूषण आणि कच्च्या रस्त्यांमुळे धुळीच्या कणांनी नागरिकांना दम्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील नागरिकांसाठी एकही आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना मुंब्रा किंवा थेट ठाणे, कल्याण गाठावे लागते. त्यामुळे दिव्यात डॉक्टरांची

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र