डोंबिवली: शहरासह २७ गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असतांना त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी आवाज उठवला की तेवढ्यापुरता डांबरीकरण करुन रस्त्यांना ठिगळ लावली जातात. पणइथे रस्ते नाहीत का? रस्ते अपघाता बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? मुलभूत सुखसुविधांसाठी प्रत्येक वेळी आंदोलनाची हाक का द्यावी लागते. शहराप्रमाणेच एमआयडीसी भाग इथले रस्ते चांगले करता की चक्काजाम करु असा इशारा भाजपचे नगरसेवक डोंबिवली ग्रामिण अध्यक्ष महेश पाटील यांनी दिला.इ-प्रभाग अधिका-यांना त्यांनी सोमवारी पत्र दिले. पण आता पत्रव्यवहार करत असून त्यात सुधारणा झाली नाही तर मात्र आंदोलन करणार, त्यात जर वाहतूक ठप्प झाली आणि कोणाचे नुकसान झाले तर मात्र त्याची जबाबदारी केडीएमसी प्रशासनाची असेल. २७ गावांमध्ये पाणी नाही, रस्ते नाही. आरोग्य नाही. दळणवळणाच्या साधनांचा तुटवडा, हे किती वर्ष का चालणार. नागरिक लोकप्रतिनिधी म्हणुन आम्हाला विचारतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना नाकी नऊ येतात. शहरातले रस्ते केले त्याचवेळी सागाव, सागर्ली, भोपर, पाथर्ली यासह गावांमधील रस्ते चांगले का केले नाहीत. आईस फॅक्ट्रीवरुन जो रस्ता महामार्गाकडे जातो तो तर वर्षानूवर्षे कधी चांगला केलाच नाही असे वाटते. एमआयडीसीकडे तो भाग आहे की, महापालिकेकडे हे प्रशासनाने बघावे. त्यात नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना त्रास नसावा. खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळतच नसल्याचे ते म्हणाले.रातोरात शहरातले जे रस्ते झाले त्या कामाच्या पाहणीसाठी महापौर राजेंद्र देवळेकरांसह जाणकार नेते उपस्थित होते. त्यांना एमआयडीसी परिसरातील रस्ते माहित नव्हते की अंतर्गत रस्त्यांची माहितीच दिली जात नाही असा सवाल पाटील यांनी केला. ग्रामिण भागाचा दौरा सातत्याने करणे आवश्यक असून तेथिल नागकिांना भेडसावणा-या कच-याच्या, पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी इ प्रभाग अधिका-यांना केले.-------------------
रस्ते अपघातात बळी गेल्यावरच चांगले रस्ते मिळणार का?- महेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:43 PM
डोंबिवली: शहरासह २७ गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असतांना त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी आवाज उठवला की तेवढ्यापुरता डांबरीकरण करुन रस्त्यांना ठिगळ लावली जातात. पणइथे रस्ते नाहीत का? रस्ते अपघाता बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? मुलभूत सुखसुविधांसाठी प्रत्येक वेळी आंदोलनाची हाक का द्यावी लागते. शहराप्रमाणेच ...
ठळक मुद्देइ प्रभाग अधिका-यांना सवालशहरात रस्त्यांना ठिगळ लावली ग्रामीणच्या रस्त्यांची डागडुजी कधी?