शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सासणे गावात दारूबंदी राहणार की उठणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:05 AM

मुरबाड तालुक्यातील सासणे गावातील तरुणांनी गेली ५० वर्षे असलेली दारूबंदी उठवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग निवडला आहे.

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सासणे गावातील तरुणांनी गेली ५० वर्षे असलेली दारूबंदी उठवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा मार्ग निवडला आहे. तर दुसरीकडे ती ही बंदी कायम रहावी, यासाठी ऊर्वरित गाव एकवटला आहे. त्यामुळे आता या ग्राम पंचायतीवर कोणाची सत्ता येते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.एक तंटामुक्त गाव म्हणून म्हसा पंचक्रोशीत सासणे गावचे नाव घेतले जाते. या गावात पन्नास वर्षे दारु बंदी कायम ठेवण्यात ग्रामस्थ यशस्वी ठरले होते. मात्र, किरकोळ व्यवसाय आणि नोकरीसाठी या गावात आलेल्या चौघांनी बनावट कागदपत्रे सादर करत अचानकच बीयर शॉप सुरू केले. यामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. त्यावेळी पदावर असलेल्या महिला सरपंच रेखा खरे यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. परंतु, आपण या बीयर शॉपला कोणत्याही प्रकारे परवानगी दिली नसल्याचे रेखा खरे यांनी सांगितले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे बीयर शॉप बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या माध्यमातून या बीयर शॉपची चौकशी सुरू केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या चौकशी अहवालानुसार या बीयर शॉपसाठी राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बीयर शॉप मालकाने सादर केलेले हे कागदपत्र बोगस असल्याचे सिध्द झाल्याने हे शॉप म्हसा यात्रेपूर्वीच बंद करण्यात आले. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल बारा लाखांचा माल हस्तगत केला.हे दुकान बंद झाल्याने त्याच्या मालकांनी वकिलाच्या सल्ल्याने प्रशासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता उत्पादन शुल्क मंत्र्यांनी देखील त्यांना फटकारले. मात्र, त्यानंतर या चौघा मालकांनी दररोजच्या गिºहाईकांशी संधान साधत ग्राम पंचायतीवर आपली सत्ता आल्यास परत बीयर शॉप सुरू करण्याचे आश्वासन दिले. हे चारही मालक निवडणुकीसाठी उभे असून बंद बीयर शॉपमध्येच निवडणुकीचे कार्यालय थाटले आहे.

टॅग्स :thaneठाणे