शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

टेंभा आश्रमशाळा दहीगाव येथे हलवणार? शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 6:33 AM

टेंभा आश्रमशाळा राज्य सरकारच्या मास्टर प्लाननुसार मंजूर असूनदेखील केवळ टेंभा गावात वनविभागाची जागा उपलब्ध नसल्याचा अजब शोध लावून ही शाळा दहीगाव येथील वनविभागाच्या जागेत हलवण्याचा घाट शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला आहे.

आसनगाव : टेंभा आश्रमशाळा राज्य सरकारच्या मास्टर प्लाननुसार मंजूर असूनदेखील केवळ टेंभा गावात वनविभागाची जागा उपलब्ध नसल्याचा अजब शोध लावून ही शाळा दहीगाव येथील वनविभागाच्या जागेत हलवण्याचा घाट शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी घातला आहे. मात्र, टेंभा ग्रामपंचायतीने याला विरोध केला असून याबाबतचे लेखी निवेदन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आणि शहापूरचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकाºयांना देऊन ही शाळा टेंभा गावातून न हलवण्याची मागणी केली आहे.टेंभा परिसरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत १० वर्षांपूर्वी तत्कालीन आ. महादू बरोरा यांच्या प्रयत्नाने टेंभा येथे निवासी शासकीय आश्रमशाळा मंजूर केली. सध्या येथे ३५० विद्यार्थी शिकत आहेत.वास्तविक, जीआरप्रमाणे मास्टर प्लाननुसार मंजूर झालेली आश्रमशाळा इतर ठिकाणी हलवता येत नाही. येथे जागा उपलब्ध नसल्यास वनविभागाची जागा ३/२ च्या प्रस्तावानुसार उपलब्ध करून जागेची अडचण सोडवता येते. मग, टेंभा येथे वनविभागाची शेकडो एकर जागा उपलब्ध असतानाही ही आश्रमशाळा दहीगाव येथे हलवण्याचा घाट का घातला जातो आहे, असा संतप्त सवाल टेंभा ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ कोर यांनी केला.दहीगाव येथे वनविभागाच्या ज्या जागेत शासनाने टेंभा येथील आश्रमशाळा हलवण्याचे ठरवले, तेथे जागा संपूर्ण खडकाळ असून सदर ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी विहीर किंवा बोअरवेलदेखील लागणार नाही, मग शासन टँकरने पाणीपुरवठा करणार का.- दीपक सापळे,सदस्य, दहीगाव ग्रामपंचायतटेंभा येथील आश्रमशाळा दहीगाव येथे हलवण्यात आल्यास सर्व आदिवासी पालकांसह ग्रामपंचायत सभासद आंदोलन करतील.- प्रकाश आमले,सदस्य, टेंभा ग्रामपंचायत