ठाणे : वाहतुकीची समस्या ही इतर शहरात देखील आहे, ठाण्यात देखील ती आहे, बॉटल नेक असल्याने काही ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी असे बॉटल नेक शोधून त्यावर टप्याटप्याने कसा मार्ग काढता येईल किंवा पर्याय शोधता येईल याचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे नवनिर्वाचीत आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. त्यातही मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करणो अधिक चांगले होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहराचा विकास हा टप्याटप्याने होत गेला आहे. त्यामुळे ठाणो हे माङया दृष्टीने वैशिष्यपूर्ण शहर आहे, या शहरात काही संधी आहेत, तर आव्हाने आहेत. संधी अशी की हे पांरपारीक शहर असून ऑरगॅनीकली डेव्हलप झाले असल्याने या ठिकाणी काम करतांना ठाणोकरांचा सहभाग चांगल्या पध्दतीने मिळू शकणार आहे. ठाणोकरांना ठाणोकर असल्याचा अभिमान वाटतो, त्यामुळे ठाण्यासाठी काही तरी करण्यासाठी ते नेहमीच सज्ज असतात, ती बाब जुन्या ठाण्यात दिसून येते. मात्र त्यांच्या मनात अभिमान निर्माण करण्याची गरज पडणार नाही. किंबहुना त्यांच्या मनात हा असेलेला हा अभिमान अधिक दृढ कसा होईल अशा पध्दतीने काम करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आव्हान पहिल्या दिवशी सांगू शकत नाही, आव्हाने अधिक आहेत, प्रत्येक शहरात आव्हाने असतात, परंतु आव्हाने आणि संधी यांची एकत्रित सांगड घालून काम करणो गरजेचे आहे. मात्र शहराच्या दृष्टीने जी आव्हाने असतील ती सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री हे ठाण्याचे असल्याने आपल्याला त्यांच्यामुळे मदतच मिळणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याने त्यांच्या करवी शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो, त्यांच्याकडे व्हिजन आहे, त्यांचे व्हिजन आपल्याला समजले तर निश्चितच शहराचा विकास करण्यात काहीच अडचणी येणार नाहीत. वाहतुकीची समस्या ही इतर शहरात देखील आहे, ठाण्यात देखील ती आहे, बॉटल नेक असल्याने काही ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी असे बॉटल नेक शोधून त्यावर टप्याटप्याने कसा मार्ग काढता येईल किंवा पर्याय शोधता येईल याचा अभ्यास केला जाणार आहे. देशातील कुठलीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ही नफा ना तोटय़ा या तत्वावर सुरु आहे. परंतु त्यातही लोकांना चांगली सेवा कशी दिली जाईल, दिवसाच्या ऑपरेशनमध्ये काही बदल केल्यास यातूनही मार्ग काढण्यात येणार आहे. इलेक्ट्रीक बस येणार असतील तर चांर्जीग स्टेशन उभारण्यासाठी हालचाली केल्या जातील.
अनाधिकृत बांधकाम हे ठाण्यातही असू शकते, त्यावर अभ्यास करुन मार्ग काढला जाईल. वृक्ष लागवडीचा वेगळा प्रयोग ठाण्यातही करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले. शहरात छोटे छोटे पॉकेट हे अर्बन फॉरेस्ट म्हणून विकसित करणो अपेक्षित आहे. देशी प्रजातीच्या वृक्ष लागवड करणो अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.