शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उल्हासनगर महापालिकेची आजची महासभा ठरणार वादळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:04 AM

३५ कोटींची कचरा व्यवस्थापन करवाढ तसेच भदाणे निलंबनाच्या विषयावरून उल्हासनगर महापालिकेची शनिवारची महासभा वादळी ठरणार आहे.

उल्हासनगर : ३५ कोटींची कचरा व्यवस्थापन करवाढ तसेच भदाणे निलंबनाच्या विषयावरून उल्हासनगर महापालिकेची शनिवारची महासभा वादळी ठरणार आहे. भदाणे यांची विभागीय चौकशी सुरू असताना निलंबनाचा ठराव आलाच कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यावर नवनिर्वाचित महापौर महासभा बोलावणार, असा अंदाज असताना उपमहापौर जीवन इदनानी यांनी शनिवारी महासभा बोलावली. महासभेत ३५ कोटींच्या कचरा व्यवस्थापन करदरवाढीला मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वीही कचरा व्यवस्थापन करदरवाढीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या वतीने महासभेत आणण्यात आला होता. मात्र, बहुमताने प्रस्ताव फेटाळून शून्य कचरा संकल्पना ठेकेदाराकडून राबवा, असा सल्ला पालिका आयुक्तांना नगरसेवकांनी दिला होता. तरीही, कचरा व्यवस्थापन करदरवाढीचा प्रस्ताव आल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.दुसरीकडे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या बंद केबिनमधील इनकॅमेºयाच्या झाडाझडतीत विविध विभागाच्या ३८७ पेक्षा जास्त फाइल्ससह कोरे व लाखो रकमेचे चेक, आयुक्तांसह उपायुक्त, इतरांचे रबरी स्टॅम्प, फोटो अल्बम, राज्य शासनाच्या उपायुक्तांची विविध ओळखपत्रे, सीडी आदी महत्त्वाचे दस्तऐवज मिळाले होते. याप्रकरणी भदाणे यांना आयुक्त गणेश पाटील यांनी नोटीस देऊन खुलासा मागितला होता. भदाणे यांनी खुलासा देऊनही निलंबित केले नाही. अखेर, विधानसभेत आ. कलानी यांनी भदाणे निलंबनासाठी स्मशानभूमीसमोर बेमुदत उपोषणाचा विषय मांडला. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली.भदाणे यांचा विषय दोन महिन्यांत महासभेत कसा?भदाणे यांच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयातील बंद केबिनमध्ये मिळालेल्या घबाडाचा ठपका ठेवून आयुक्तांनी निलंबित केले. तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरू असताना त्यांच्या निलंबन कारवाईवर निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांत विषय आलाच कसा, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. तसेच भदाणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगरसेवक प्रमोद टाले यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल आहे. निलंबनाविरोधात न्यायालयात भदाणे यांनी दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने भदाणे यांची याचिका फेटाळली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका