कल्याण - कल्याण ग्रामीण भागातील वाघेरपाडा या आदीवासी वादीमध्ये विन होम च्या माध्यमातून आज तरुणांसोबत जागतिक एड्स दिवसाचे औचित्य साधत त्या आजरा विषयी जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या वतीने विशाल जाधव यांनी तरुणाईसोबत मुक्तपणे सवांद साधला. यामध्ये मुलांना भारत व त्यातील एच आय व्ही व एड्सची सद्याची स्थिती व सुरवात याची मांडणी करण्यात आली. एड्स हा आजार मुळातच सामाजिक बहिष्कार म्हणून व लैंगिकतेशी जोडला गेल्याने त्याविषयी आपले बरेच समज गैरसमज असतात शिवाय आपण स्वतःपेक्षा समाज काय विचार करेल यावर जास्त भर देतो असतो हे अगदी चुकीच आहे आपण तरुणांनी एच आई व्हि तपासणी करने ही आजची काळाची गरज आहे. मोबाइलवरील स्टेटसला आपण फार महत्त्व देतो परंतु आजच्या स्थितीत स्वतःच या आजाराबाबत काय स्टेटस आहे माहीत आहे का असे विशाल जाधव यांनी युवकांना पटवून देण्यात आले.
एड्स होण्याची प्रमुख कारणे व त्यांचे लक्षणावर सि. रिचर्ड यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. युवकांनी मच्छर चावल्याने किंव्हा एकत्र जेवल्याने, एकच वस्तू वापरल्याने एच आय व्ही/एड्स होतो का प्रश्न विचारले त्यांचे निरसन करण्यात आले व सरते शेवटी एक शपथ सर्व युवकांना देण्यात आली की लग्न जमावताना जसे आपण कुंडली ला महत्त्व देतो व गुण जुळवळतो त्यापेक्षा आजपासून पुढे आपण सर्व युवक जोडीदार निवडताना दोघांनीही एच आय व्ही/एड्स ची तपासणी करूनच लग्न करायचे आहे.वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संविधान युवक गटाचे सहकार्य मोलाचे होते.