शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
2
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
3
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
4
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
5
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
6
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
7
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
8
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
9
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
10
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
11
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
12
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
13
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
14
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
15
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
16
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
17
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
18
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
19
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
20
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

डिपॉझिट कायकू वापस लेने का?; अनेक पराभूत उमेदवार सोडतात उदक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:55 PM

निवडणूक विभागाकडे हिशेबच नाही

ठाणे : लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या काही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याच्या बातम्या होतात. मात्र दुसऱ्या अथवा तिसºया क्रमांकाची मते मिळून पराभूत झालेल्या अधिकृत पक्षाच्या कोट्यवधी रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करणारे अनेक उमेदवार डिपॉझिटची रक्कम परत घेण्याची प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत. मात्र किती उमेदवार ही रक्कम परत घेतात व किती त्यावर उदक सोडतात, याची कोणतीच आकडेवारी निवडणूक आयोगाकडे नाही.

लोकसभा निवडणुकीकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अर्जासोबत भरायच्या डिपॉझिटची रक्कम २५ हजार रुपये असून आरक्षित मतदारसंघातील उमेदवारांकरिता साडेबार हजार रुपये आहे. विधानसभेकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता डिपॉझिटची रक्कम दहा हजार रुपये असून आरक्षित मतदारसंघातील उमेदवारांकरिता पाच हजार आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांचे डिपॉझीट जप्त होते. मात्र भाजपच्या विरोधात काँग्रेस किंवा शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मातब्बर उमेदवार रिंगणात असेल तर अशा अधिकृत पक्षाच्या मातब्बर उमेदवारांपैकी फारच थोडे डिपॉझिटचे पैसे परत नेतात, असे कळते.

आयोगाच्या अधिकाºयाने सांगितले की, याकरिता फॉर्म भरावा लागतो. अर्थात किती उमेदवार फॉर्म भरतात व रक्कम क्लेम करतात त्याची माहिती उपलब्ध नाही. काँग्रेसच्या एका पराभूत उमेदवाराने सांगितले की, डिपॉझिटची रक्कम परत घेतल्याचे ऐकिवात नाही. आमचा इलेक्शन एजंट ही प्रक्रिया करीत असेल तर कल्पना नाही. अनेकांना पराभवानंतर क्षुल्लक रक्कम नको असते. लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसच्या एका उमेदवाराने डिपॉझिटची रक्कम आपण यापूर्वी कधी घेतलेली नाही, असे सांगितले.लोकसभा निवडणूक उलटून गेली तरी अजून डिपॉझीटच्या रकमेचा धनादेश प्राप्त झालेला नसल्याचे एका उमेदवाराने सांगितले. ही प्रक्रिया वेळकाढू असल्याचे तो म्हणाला. उमेदवाराला त्या रकमेत रस नसल्याचे अन्य एका लोकसभा उमेदवाराने सांगितले.उमेदवाराच्या डिपॉझीटखेरीज बॅनर, फ्लेक्स, झेंडे वगैरे निवडणूक प्रचार साहित्य लावतानाही डिपॉझीट भरावे लागते. सरकारी मालमत्ता पूर्ववत करण्याचा खर्च त्यातून केला जातो. उर्वरित रक्कम परत करण्यास विलंब होतो.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग