लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सलग वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर शिवाजीनगर भागातील एक घरफोडी उघड करण्यात राबोडी पोलिसांना यश आले आहे. लॉकडाऊनमध्येही हजारोंचा खर्च करणाºया या साबिरा मोहम्मद शेख (४४, रा. राबोडी, ठाणे) या महिलेला अखेर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तीन लाख ६५ हजारांचे १३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.राबोडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील शिवाजीनगर भागात राहणाºयास एका महिलेच्या घरी ३१ आॅगस्ट २०१९ रोजी १९ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार महिला नोकरीनिमित्ताने घराबाहेर असल्याने घरी कोण येऊन गेले? याची प्राथमिक तपासात कोणतीच माहिती उपलब्ध होत नव्हती. पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस नाईक विलास वसावे आणि पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खडसरे आदींच्या पथकाने या चोरीचा तपास केला. कोणतेही धागेदोरे नसल्यामुळे या चोरीच्या तपासात अनेकांच्या फोनचे सीडीआर तपासण्यात आले. त्याचवेळी त्याच भागातील तक्रारदार महिलेच्या घराशेजारी पूर्वी राहणारी महिला अचानक मोठी खरेदी करीत असल्याचे आढळले. सखोल चौकशीत तिने एका सराफाकडे काही दागिने गहाण ठेवल्याचेही उघड झाले. संबंधित सोनार आणि तक्रारदार महिलेच्या मार्फतीने दागिन्यांची ओळख पटविण्यात आली. तेंव्हा याप्रकरणात २१ सप्टेबर रोजी साबिराला राबोडी पोलिसांनी अटक केली. तिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. याच काळात तिने ज्या सराफांकडे दागिने गहाण ठेवले होते, त्यांच्याकडून १३ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. तिला गुरुवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील शिवाजीनगरातून १९ तोळयांचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 11:48 PM
शिवाजीनगर भागातील एक घरफोडी उघड करण्यात राबोडी पोलिसांना वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर यश आले आहे. तब्बल १९ तोळयांच्या दागिने चोरी प्रकरणी साबिरा मोहम्मद शेख (४४) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून १३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देराबोडी पोलिसांची कामगिरीसलग वर्षभर केला पाठपुरावा