ठाणे : बुरखा घालून कपडे शिवण्याचा बहाणा करून इमारतींमध्ये शिरून चोरी करणा-या शिरीन नुरअली शेख (३३, रा. अंबरनाथ) या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने नुकतीच अटक केली आहे. तिच्याकडून चोरीतील ३८ तोळे सोने, ५८ ग्रॅम ४२० मिली ग्रॅम चांदीचे दागिने, घड्याळे आणि बॅग असा ११ लाख ४९ हजार २१० रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी गुरुवारी दिली.उल्हासनगर परिमंडळातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात चोºयांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले होते. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाकडूनही समांतर तपास सुरूहोता. त्याचदरम्यान पोलीस हवालदार सुनील जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सालगुडे, श्रीकृष्ण नवले आणि उपनिरीक्षक गणेश तोरगल आदींच्या पथकाने २१ डिसेंबर २०१८ रोजी अंबरनाथच्या विम्कोनाका येथे सापळा लावून शिरीन शेख हिला ताब्यात घेतले. कोहोजगाव येथील एका घराच्या दरवाजाची कडी लोखंडी कटावणीने तोडून त्या घरातील सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा एक लाख ५६ हजारांचा ऐवज तिने चोरल्याची तिने कबुली दिली. बुरखा परिधान करून कपडे शिवण्याच्या बहाण्याने इमारतींमध्ये शिरून त्याच इमारतीमधील एखादे बंद घर ती हेरत असे. महिला असल्यामुळे तिची कोणीही तपासणी करत नव्हते. दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान ती अशा घरांमधून चो-या करत होती. अंबरनाथ पश्चिमेकडील या चोरीसह तीन ठिकाणांहून ११ लाख ४९ हजार २१० रुपयांचा ऐवज चोरल्याचे चौकशीत उघड झाले. तिच्याकडून सोनेचांदीच्या दागिन्यांसह सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कपडे शिवण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:27 PM
इमारतींमधील बंद घरांची रेकी करुन दुपारी १२ ते ३ या काळात घरात चोºया करणाºया शिरीन शेख या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने अटक केली. तिच्याकडून ११ लाख ४९ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाची कामगिरी११ लाख ४९ हजार २१० रुपयांचा ऐवज हस्तगतचोरीचे तीन गुन्हे उघड