शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

दोन मॉडेलना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलाल महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 10:06 PM

मुंबईच्या दोघी नामांकित मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी भार्इंदरच्या उत्तन येथे आणणारया प्रोडक्शन क्षेत्रातील महिला दलालास पोलीसांनी सापळा रचुन अटक केली आहे.

 मीरारोड - मुंबईच्या दोघी नामांकित मॉडेलना वेश्याव्यवसायासाठी भार्इंदरच्या उत्तन येथे आणणारया प्रोडक्शन क्षेत्रातील महिला दलालास पोलीसांनी सापळा रचुन अटक केली आहे. तर हा हाईप्रोफाईल वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला असला तरी पकडण्याचे ठिकाणी मात्र चक्क सार्वजनिक रस्ता दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रॉडक्शन क्षेत्रात काम करणारया अनिता घोसाळकर (३८) रा. कुर्ला मार्केट डिसोजा चाळ ही महिला नामांकित मॉडेल वेश्या व्यवसायासाठी पुरवत असल्याची माहिती मिळाल्यावर भार्इंदर विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सापळा रचुन बनावट गिरहाईका मार्फत तीच्याशी संपर्क साधला. अनिताने आपल्याकडे नामांकित मॉडेल ह्या वेश्याव्यवसायासाठी असल्याचे सांगत एका मॉडेल चा दर हा सव्वा लाख रुपये असल्याचे सांगितले. पोलीसांना या हाई प्रोफाईल सेक्स रॅकेटची खात्री पटताच गिरहाईकांमार्फत ३ मॉडलची मागणी करण्यात आली. सदर मॉडेलना वेश्या व्यवसाय करिता भार्इंदरच्या उत्तन -धावगी येथील सिल्वर डोर रिसॉर्ट हे ठिकाण निश्चित करण्यात आले.शनिवारी रात्री मात्र अनिता ही अंधेरी व ओशिवरा येथे राहणारया २८ व २४ वयोवर्षाच्या दोन मॉडेलना घेऊन आली. त्यांना घेऊन बनावट गिरहाईक हे रिसॉर्ट जवळ आले. मॉडेल साठी ग्राहकांनी अनिता हिला १ लाख रुपयांची रोकड हातात दिल्यावर तीने उर्वरीत पैशांची मागणी केली. त्याच वेळी पोलीसांनी धाड टाकुन तीला अटक केली.पोलिसांनी अनिता हीला वेश्याव्यवसाय प्रकरणी पीटा कायद्या खाली अटक केली असून, दोघी मॉडेलना पीडित म्हणुन मानपाडा येथील महिला सुधारगृहात नेण्यात आले.सोशल मीडियावर रात्री पासूनच सदर रिसॉर्ट हे भाजपा नगरसेवकाचे असल्याचे मॅसेज फिरू लागले. नंतर मात्र पोलिसांनी सदर प्रकरणाशी रिसॉर्ट मालकाचा सबंध नसल्याचा खुलासा केला. पोलिसांना वेश्याव्यवसायसाठी आलेल्या मॉडेल कडून आक्षेपार्ह्य वस्तु मिळाल्या असून,  आरोपी अनिता हिला २१ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस तपास करीत आहेत.वास्तविक सदर रिसॉर्ट भाजपा नगरसेवकाशी सबंधित असल्याने पोलिसांनी घटनास्थळ तेथे न दाखवता रिसॉर्ट बाहेरील सार्वजनिक रस्ता दाखवल्याचा आरोप होत आहेत. मुंबईतील टॉपच्या मॉडेल व त्या क्षेत्रातील दलाल महिलेस चक्क रस्त्यावर पाकडण्यात आले. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचा एक व्हिडियो व्हायरल झाला असुन त्यात एक मॉडेल सदर रिसॉर्ट मध्ये या आधी देखील आल्याचे बोलत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाCrimeगुन्हाArrestअटक