शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महिला बालकल्याण समितीचा परदेशवारीचा घाट, नेपाळ दौऱ्यासाठी प्रशासनाने काढली निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:12 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. परदेशात दौरे काढले जात नसतानाही पालिकेने नेपाळमधील पर्यटनस्थळी नगरसेविकांच्या दौºयासाठी निविदा मागवल्या असून कार्यादेश देणे बाकी असल्याचा प्रकार उघड झाला आहे.नगरसेवकांच्या या पर्यटन सहलींवरून नेहमीच टीकेची झोड उठली आहे. नागरिकांमध्ये सातत्याने संताप व्यक्त होत आहे. तसे असताना नगरसेवक, अधिकाऱ्यांची करदात्या नागरिकांच्या पैशांमधून पर्यटन सहलींवर मौजमजा करण्याचा हव्यास मात्र अजूनही थांबलेला नाही. आतापर्यंत काही कोटी रुपयांची उधळपट्टी या पर्यटन सहलींवर केली गेली असून यातून शहराच्या हिताचे मात्र काहीच साध्य झालेले नाही. दौºयांचा प्रत्येक दिवसानुसार अहवालही आजपर्यंत सादर झालेला नाही.महिला बालकल्याण समितीमध्ये १५ सदस्या असून या समितीची मुदत सप्टेंबरअखेरीस संपलेली आहे. समितीच्या सभापतीपदी भाजपच्या दीपिका अरोरा तर उपसभापती भाजपच्या वंदना भावसार या होत्या. समितीच्या कार्यकाळात २० जुलै रोजी अभ्यासदौरा काढण्याचा ठराव भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेविकांनी एकमताने मंजूर केला होता. त्यासाठी १५ लाखांची तरतूद आहे. इतर शहरांत जाऊन नवीन योजनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे ठरावात नमूद केले होते.समितीच्या ठरावानंतर प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आणि आयुक्त बालाजी खतगावकर यांनीही त्यास मंजुरी दिली. गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रस्तावात दौरा कुठे काढायचा, याची माहितीच नमूद नव्हती. तसे असताना पालिकेने चक्क समितीच्या नेपाळ दौºयासाठी निविदा मागवल्या. २ नोव्हेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर होती. महिला-बालकल्याण समितीच्या नगरसेविकांसाठी नेपाळ दौºयाच्या आयोजनाबाबत पालिकेस तीन निविदा प्राप्त झालेल्या आहेत. तीन कंत्राटदारांनी निविदा भरल्या असून त्या उघडण्यात आल्या का? याची माहिती देण्यास प्रशासन टाळटाळ करत आहे.सरकारच्या आदेशानुसार महिला व बालकांच्या योजनांच्या अभ्यासासाठी प्रशिक्षण सहल चांगल्या योजना राबवण्यात येत आहेत. त्या क्षेत्रास भेट द्यावी असे आहे. सरकारी योजना व कार्यालयीन कामकाजाबाबत प्रशिक्षण द्यावे व त्यासाठी प्रतिलाभार्थी दरमहा जास्तीतजास्त दोन हजार खर्च करावेत, असेही आदेशात स्पष्ट नमूद आहे. परंतु, समितीने मात्र चक्क परदेशात नेपाळ येथे अभ्यासाच्या नावाखाली पर्यटन सहलीचे आयोजन करत निविदा मागवल्याचे उघड झाले आहे.समितीची मुदत संपलेली आहे. पण, नेपाळ येथे अभ्यासदौरा काढण्याची निविदा प्रशासनाने काढलेली आहे. प्रशिक्षण दौºयाची तरतूदच पालिकेने करू नये. नेपाळ दौरा रद्द करण्यासाठी पत्र देणार आहे.- दीपिका अरोरा, माजी सभापतीपरदेशात दौरा काढताच येत नाही. याबाबतची माहिती आपण मागवत आहोत. महिला बालकल्याण समितीची मुदत संपलेली असल्याने हा दौराच रद्द केला जाईल.- बालाजी खतगावकर, आयुक्तनगरसेवक आणि अधिकाºयांची नागरिकांच्या पैशांवर मजा मारण्याची खोड काही जात नाही. नागरिकांवर कर लादता आणि स्वत: मात्र मजा मारता. पालिकेने नेपाळ दौºयाची निविदा काढलीच कशी? महिला-बालकल्याण समितीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे असून सखोल चौकशी करून नगरसेविका आणि अधिकाºयांवर कारवाई करा.- हेमंत सावंत, शहर संघटक, मनसे

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर