लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरुन घोडबंदर रोड मार्गे मानपाडा येथून येऊर येथील घरी परतणाºया सोनलदेवी सरंगी राम (४९, रा. येऊर गाव, ठाणे) यांचा चक्कर येऊन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनलदेवी या त्यांचा मुलगा राहूल राम (१९) याच्याबरोबर १३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी आपल्या घरी जात होत्या. त्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी वाघबीळ येथे गेल्या होत्या. त्यातच अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्या राहूलसह पुन्हा घराच्या दिशेने मोटारसायकलवरुन घरी परतत होत्या. त्याचवेळी त्यांना रस्त्यातच अचानक चक्कर आली. काही समजण्याच्या आतच त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या. त्यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला मार लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी मुलगा राहूल याने दिलेल्या माहितीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. पालवे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मुलासोबत मोटारसायकलवरुन जातांना चक्कर आल्यामुळे महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 10:30 PM
मोटारसायकलवरुन घोडबंदर रोड मार्गे मानपाडा येथून येऊर येथील घरी परतणाऱ्या सोनलदेवी सरंगी राम यांना चक्कर आल्यामुळे त्या खाली पडल्या. यातच गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली.
ठळक मुद्दे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील घटना मुलानेच दिली पोलिसांना माहिती