लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तीन हात नाका ते मुलूंडच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे ते सायन या बेस्ट बसच्या धडकेने मोटारसायकलीवरुन जाणाºया प्रतिक्षा परब (३५) या विवाहितेचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या अपघातामध्ये तिचे पती प्रमोद शाम (४०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, बस चालक अनिल पवार (४५) यांना ताब्यात घेतल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.ठाणे- मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरील तीन हात नाका ते मुलूंडच्या दिशेने प्रमोद आणि प्रतिक्षा हे पती पत्नी त्यांच्या मोटारसायकलवरुन जात होते. पती प्रमोद हे मोटारसायकल चालवित होते. तर त्यांची पत्नी प्रतिक्षा पाठीमागे बसलेली होती. त्याच मार्गावरुन जाणाºया खोपट ते सायन या बेस्ट बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेने मोटारसायकलवरुन दोघेही खाली पडले. प्रतिक्षा खाली पडल्यानंतर तिच्या अंगावरुन बसचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यु झाला. प्रमोद यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना एका खासगी वाहनातून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बेस्टची बस आणि मोटारसायकल ही दोन्ही अपघातग्रस्त वाहने नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अपघातानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात स्वत: हजर झालेले बेस्टचे चालक पवार यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुचाकीवरील ही महिला बसच्या मागील चाकाखाली कशी आली? याबाबत काहीच माहिती नसल्याचे पवार याने चौकशीमध्ये पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात बेस्टच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यु: पती गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 7:15 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तीन हात नाका ते मुलूंडच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे ते सायन या बेस्ट बसच्या धडकेने ...
ठळक मुद्दे बस चालकाविरुद्ध गुन्हा नौपाडा पोलिसांची कारवाई