ठाणे : घोडबंदर रोडवरील शेतजमीन बळकावण्याकरिता तिच्या खरेदीविक्रीची बनावट कागदपत्रे तयार करून त्याच शेतावर अनोळखी व्यक्तींना पाठवून जमिनीचा ताबा न दिल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी एका महिलेला दिल्याप्रकरणी तिघांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कासारवडवली, ओवळा, कोळीवाडा येथे राहणाऱ्या नैना प्रकाश भोकरे यांनी दिलेल्या तक्रारीत, मयत महादेव भोकरे व दीपक ढेढिया, धीरज शहा आणि अभिषेक परमार यांनी सरकारी कार्यालयात कूलमुखत्यारी असल्याचे खोटे भासवून मौजे-भार्इंदरपाडा येथील जमिनीच्या विक्रीपरवानगीसाठी अर्ज केला व खोटे जबाब देऊन जमीनविक्री करण्याची परवानगी प्राप्त केली. त्यानंतर, खरेदीविक्रीची बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच फसवणून डीड आॅफ कन्फर्मेशनवर सह्या घेतल्या आणि जमिनीचा ताबा न दिल्यास वाईट परिणाम होईल, अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
जमीन बळकावण्यासाठी महिलेला धमकी
By admin | Published: April 29, 2017 1:39 AM