डोंबिवली - दिवसेंदिवस रेल्वे प्रवास हा धोक्याचा होत असतानाच महिला प्रवासीच महिला सहप्रवाशांचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणच्या रहिवासी हर्षा चव्हाण यांनीच त्यांचा इंद्रायणी एक्स्प्रेसमधील महिला डबा मागतोय मोकळा श्वास, अशा आशयाचे पत्र ‘लोकमत’ला पाठवले आहे. त्यात महिला प्रवाशांची सुटका करा आणि छळ मांडणाऱ्या महिलांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.चव्हाण म्हणाल्या की, इंद्रायणी एक्स्प्रेसमधून पुण्याहून ज्या महिला नित्याने प्रवास करतात, त्यापैकी काही प्रमाणात मी देखील त्या डब्यातूनच प्रवास करते. कधी कल्याण येथून प्रवास तर कधी मुंबई-पुणे या गाडीच्या परतीच्या प्रवासात मी त्या डब्यात असते. पण अनेकदा केवळ आसनव्यवस्थेसारख्या क्षुल्लक कारणावरून महिला एकमेकींचे केस उपटणे, चावा घेणे, मारहाण करणे, सतत टोमणे मारणे, मोठ्याने नाहक बोलणे, आवाज-गोंधळ घालणे, खोट्या तक्रारी करून दबाव आणणे, दहशत निर्माण करणे, सीटवर झोपून राहणे, महिला सहप्रवासी गरीब असेल तर विकृतपणे हसून खिल्ली उडवणे, असे नानाविध प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, महिला प्रवाशांची ही दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून आता सहन होत नाही. यासंदर्भात पुणे रेल्वे पोलिसांकडेही तक्रार दिली. मात्र, अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अरेरावी, अर्वाच्य भाषेमुळे नाराजीपास दाखवा अन्यथा हाकलून देऊ, अशी अरेरावी करत महिलांची टोळकी अन्य महिला सहप्रवाशांना टार्गेट करून अर्वाच्य भाषेत बोलतात. हे काही योग्य नाही. मी मासिक पासधारक असूनही अशा विकृत मानसिकतेची अनुभूती आल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडावी, असे त्या म्हणाल्या. जेणेकरून असे कृत्य करणाºया महिला प्रवाशांना चाप बसेल, तसेच कारवाई अथवा समुपदेशन झाल्यास गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक महिला आदींना न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या.
इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलाच करतात महिलांचा छळ, त्रस्त महिलेचे ‘लोकमत’ला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:57 AM