शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

महिलांनी माझ्यासारखे कपडे घातले नाही तरी चांगल्या दिसतात; योगशिबिरात रामदेव बाबांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 8:25 AM

अमृता फडणवीस यांच्यात १०० व्या वर्षीही आपणास म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाही, अशा शब्दांत रामदेव यांनी त्यांची स्तुती केली. ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी नि:शुल्क योगशिबिर आणि महिला संमेलनाचे सकाळी पाच वाजता आयोजन केले होते.

ठाणे: महिलांनी साडी, सलवार सूट परिधान केल्यावर त्या सुंदर चांगल्या दिसतात, तसेच माझ्यासारखे त्यांनी कपडे परिधान केले नाही तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी ठाण्यात महिलांच्या योगशिबिरात केले. यावेळी रामदेव यांच्यासमवेत व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.अमृता फडणवीस यांच्यात १०० व्या वर्षीही आपणास म्हातारपणाच्या खुणा दिसणार नाही, अशा शब्दांत रामदेव यांनी त्यांची स्तुती केली. ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी नि:शुल्क योगशिबिर आणि महिला संमेलनाचे सकाळी पाच वाजता आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांच्यासह दीपाली सय्यद, आमदार रवी राणा आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी महिलांना संबोधित करताना, रामदेवबाबांनी उपरोक्त वादग्रस्त विधान केले. अमृत फडणवीस यांच्याकडे तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्या शंभर वर्षांपर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, त्या नेहमीच तोलून-मापून खातात. त्या आनंदी राहतात, त्यांच्याकडे पाहाल तर त्या नेहमी लहान मुलांप्रमाणे हसतमुख राहतात, असेही ते म्हणाले. रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीस यांना त्यांचा हसरा चेहरा आपल्याकडे करण्याची विनंती केली व त्यानंतर वरील वादग्रस्त वक्तव्य केले.  

भारताकडे योगशक्तीलहान मुलांना कोण कपडे घालतो, ते आठ ते १० वर्षांचे होईपर्यंत उघडेच फिरत असतात, अशी मल्लिनाथी त्यांनी केली. भारताकडे योगशक्ती असून ती महान आहे. भारताला महान शक्ती बनविण्यासाठी आंदोलन, महायज्ञ अभियान राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाthaneठाणेYogaयोगासने प्रकार व फायदेWomenमहिला