पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

By अजित मांडके | Published: September 25, 2023 03:41 PM2023-09-25T15:41:57+5:302023-09-25T15:42:40+5:30

कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

Women expressed their anger against the water issue in thane | पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

googlenewsNext

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर आता अजित पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ असलेल्या कळवा, मुंब्य्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून येथील गणेशोत्सव मंडळांना घरगुती गणपतींना भेटीगाटी सुरु केल्या आहेत. अशातच कळवा पूर्व येथील, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर झोपडपट्टीतील महिलांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्यापुढे संताप व्यक्त केला आहे. यावेळी कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले.

कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पोंडपाडा, भास्कर नगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या गाठीभेटी घेत असताना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार, कळवे पूर्व येथील महिलांनी व नागरिकांनी केली. याबाबत संतप्त रहिवाशांशी बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, संध्याकाळपासून मी स्वत: व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला व सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कळवा पूर्व वस्तीतील या डोंगर परिसरात गणरायाचे आशिर्वाद घेण्थासाठी घरोघरी जात आहोत. यावेळी आम्हाला लोकांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद आम्ही अनुभवत आहोत. लोकांना बदल हवा आहे. लोकांनी खासकरुन कळवा पूर्व येथील आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, पौडपाडा, भास्कर नगर मधील अनेक गल्ल्यांमध्ये फिरताना, येथील महिलांनी मुलभूत सुविधा असलेल्या पिण्याच्या पाण्याविषयी तक्रार केली की, आठवड्यातून फक्त एकदा, ते ही अवघे दोन तास पिण्याचे पाणी मिळते. १५ वर्षे येथुन प्रतिनिधित्व करत असलेले लोकप्रतिनिधी, येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. यामुळे येथील महिलांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात आमच्याकडे रोष व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींची पोलखोल येथील महिलांनी केली असल्याचे नजीब मुल्ला म्हणाले. मुलभुत सुविधा, रस्ते, गटार, लाईट, पिण्याचे पाणी यांची येथे वाणवा आहे. बोरिंगच्या पाण्यासाठी नागरिकांकडून ५०० रुपये वसूल केले जातात. गोरगरिबांकडून हे पैसे कोण वसूल करतो ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींनी लोकाचे हित पहायचे असते, लोकांच्या पैशातून घरदार चालवायचे नसते. श्री गणेश दर्शन करताना लोकांची होणारी लुट समोर आली आहे. ही लूट आम्ही बंद करुन लोकांना तत्काळ पिण्याचे पाणी पुरविणार आहोत, असे जाहीर आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Women expressed their anger against the water issue in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.