ठाणे : शिक्षणाचं माध्यम कोणतंही असो, भाषेचे संस्कार योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं केल्यास नवी पीढी देखिल साहित्याची गोडी चाखून त्याचा लळा आजुबाजूच्यांनाही कसे लावू शकते याचं जणू प्रात्यक्षिकच या कार्यक्रमात ९ ते १४ वयोगटातल्या मुलांनी अत्रे कट्ट्यावर रसिकांसमोर सादर केले. आवाजसंस्कृती केंद्र या ठाण्यातल्या संस्थेत ही मूलं साहित्याच्या अशा वेगवेगळ्या प्रांताचा लहानपणापासून अभ्यासच करतायत असे गौरवोद्गार उपस्थितांनी यावेळी काढले.
आवाज संस्क्रृती केंद्रातर्फे साहित्यजागर या कार्यक्रमाअंतर्गत कथाकथनाची अनोखी पद्धत, बालनाट्य, पथनाट्य, बालकवितांचा निवेदनासह कार्यक्रम सादर केला जातोय. हल्लीची मुलं ही एकतर प्रचंड अभ्यासाच्याओझ्याखाली दबलेली असतात आणि वेळ मिळेल तेव्हा टीव्ही, मोबाईलच्या विळख्यात सापडलेली असतात. या पार्श्वभूमिवर लहानपणापासूनच साहित्याचा संग जोपासणयासाठी अशाप्रकारे उल्लेखनिय कार्यक्रमात सहभागी होणार्या या मुलाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे असं मुलांचं कौतुक करताना स्मिता पोंक्षे म्हणाल्या. अत्रे कट्ट्यावर कार्यक्रम सादर करणार्या या मुलांचे संपुर्ण महाराष्टभर कार्यक्रम होतील आणि लहान मुलांच्या हाती साहित्याची पताका सोपवण्यासाठी असे कार्यक्रम झालेच पाहीजे अशा शुभेच्छा कट्ट्याच्या कार्यवाह शीला वागळे यांनी बोलताना दिल्या. कार्यक्रमादरम्यान लाईटस् जाऊनही मुलं थांबली नाहीत. त्यांनी मेबाईलच्या उजेडात कार्यक्रम पुढे सुरुच ठेवला यासाठी उपस्थितांनी मुलांचे कौतुक केले. पाऊस असतानाही कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या मुलांप्रमाणेच इतर मुलांचेही हा साहित्यजागर ऐकण्यासाठी कान तयार करायचे असल्याचा मानस संस्थापिका माधवी राणे यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात साक्षी गवारी, वैदेही विरकर,राधा कुळकर्णी, अक्षता सुराडकर, वैष्णवी जुवेकर,पुर्वा कोल्हे, क्षितीज दुबळे,वीर म्हात्रे, कैवल्य राणे, आर्य सारंग ,सिद्धार्थ मोरे या मुलांनी उत्कृष्टरित्या संपुर्ण कार्यक्रम सादर केला.
आवाज संस्कृती केंद्रातर्फे ही मूलं राज्यबालनाट्य अनेक प्रकारच्या नाट्य, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन , सादरीकरण, श्लोकपठण अशा सर्व कलांना एकाच ठिकाणी, एकत्र अंगिकारत असतात. त्यासाठी उपस्थित मान्यवरांनी मुलांना पुढच्या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.