ठाणे :प्रथमच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांचे स्वतंत्र प्रसाधनगृह वूलु म्हणजेच महिलांसाठी वुमन्स पावडर रूम सुरु करण्यात आली आहे. भरतील हि पहिली रूम आहे, ज्यात एका छताखाली सुरक्षेसाठी अनेक सुविधा मिळणार आहे. वर्ल्ड टॉयलेट दिनानिमित्त या रूमचे उदघाटन करण्यात आले.
ठाणे, मुंबईमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृह अनेक आहेत परंतु स्वच्छता सुरक्षिततेच्या बाबतीत अजून सुधारलेले नाही.परंतु महिलांना नाईलाजाने अशा प्रसाधनगृहाचा वापर करावा लागतो. प्रसाधनगृह व्दिलैंगिक असल्याकारणाने महिलांना मोकळीक मिळत नाहीत व तेथे जाण्यास त्या टाळतात. स्त्री वर्गास मासिक पाळी अशा अनेक परिस्थितीला सामोरे जावे लागते. व्दिलैंगिक प्रसाधनगृह असल्यामुळे तिथे जाणे महिलांना अवघड वाटते आणि त्यांच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण होऊ शकतो. या अनेक समस्या जाणून लूम्स ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि या संस्थेने ‘लू- वुमन्स पावडर रूम हा नवउद्यमी प्रकल्प महिलांसाठी आणला आहे.या संस्थेचे संस्थापक मनीष केळशीकर आणि सहसंस्थापिका शिवकला मुदलीयार आहेत. वूलु ही संकल्पना पाश्चिमात्य देशातील असून या ठिकाणी महिलांसाठी प्रसादनगृहासोबत सॅनेटरी पॅड, चहा, कॉफी, प्रतिक्षालय, महिलांच्या वस्तू उपलब्ध असतात. अशाच एका उपक्रमची ठाण्यात सुरवात झाली असून या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळ्त आहे. वुमन्स पावडर रूमचा लाभ घेण्यासाठी प्रतीवेळी २० रुपये शुल्क आकारला जातो. त्याचबरोबर ४९९ रुपयांचा मासिकपास महिला घेऊ शकतात. या उपक्रमाला ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नव्या प्रकल्पाने महिलांना उच्च दर्जाचे, स्वच्छ, व आमच्यासाठी सुरक्षिततेचे स्वतंत्र प्रसादानगृह निर्माण केले याचा आम्हाला आनंद आहे. वेळीच लागणाऱ्या स्त्री उपयोगी वस्तू येथे उपलब्ध आहेत. या उपक्रमाचा लाभ अधिक महिलांना व्हावा म्हणून अशा शाखा मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी निर्माण व्हाव्यात अशी आशा लाभार्थी महिलांनी व्यक्त केली. या येत्या काही वर्षात संपूर्ण मुंबईमध्ये ‘लू- वुमन्स पावडर रुमच्या आणखी शाखा उपलब्ध करण्याचा लूम्स ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि या संस्थेचा मानस आहे. ‘वुलू’ या महिलांसाठी असलेल्या अनोख्या प्रकल्पाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचावी याकरिता,वुलूच्या वुमन्स पावडर रूम मध्ये काढलेले स्वतःचे फोटोज समाजमाध्यमांद्वारे ‘वुलू’ असे हॅशटॅग वापरून शेअर करण्याचे आवाहन मनीष केळशीकर आणि शिवकला मुदलीयार यांनी केले आहे.“वुलू” मध्ये महिलांसाठी पुढील गोष्टी असणार उपलब्ध.· उच्च दर्जाचे प्रसाधनगृह· सॅनिटरी पॅड्स· चहा-कॉफी· सिविंग किट· ब्युटी प्रोडक्ट्स· पाण्याच्या बॉटल्स· सॅनिटायझर· सुमधुर संगीत· चॉकलेट्स