कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने बारावे घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यात दररोज २०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प एप्रिलपर्यंत बांधून पूर्ण करण्याची डेडलाइन घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिकेने तेथे प्रकल्प उभारला आहे. मात्र, दररोज ६४० मेट्रिक टन कचरा येत असल्याने प्रक्रिया क्षमता आणि दररोज येणारा कचरा, यात मोठा फरक आहे. त्यामुळे उंबर्डे, बारावे आणि मांडा प्रकल्प सुरू होत नाहीत, तोपर्यंत आधारवाडी डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करता येणार नाही. महापालिकेने डम्पिंग बंद करण्यासाठी व उंबर्डे, बारावे आणि मांडा प्रकल्पासाठी ६० कोटींच्या निविदा मागविल्या. मात्र, या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला नसल्याने कंत्राटदार सौराष्ट्र कंपनीला या प्रकल्पांची कामे सुरू करता आली नाहीत.
पर्यावरण विभागाकडून जून २०१८ मध्ये पर्यावरण ना-हरकत दाखला प्राप्त झाला. त्यानुसार उंबर्डे प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, बारावे परिसरातील ५२ सोसायट्यांनी नागरी वस्तीत प्रकल्प राबविण्यास विरोध केला. तसेच एका जागरूक नागरिकाने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिकेद्वारे प्रकल्पास हरकत घेतली. लवादाने प्रकल्पास एक महिन्यासाठी स्थगिती दिली. मात्र, त्यानंतर ती उठविली. तसेच हे प्रकरण पुन्हा राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे सुनावणीस पाठविले. त्यानुसार, सरकारने नेमलेल्या देवधर समितीने प्रकल्पाची पाहणी केली. जागरूक नागरिकाने दोन वेळा राज्य सरकार व लवादाकडे दाद मागितली.बारावे प्रकल्प हा घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीसंदर्भातील २०१६ च्या केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे, असे हरकत घेणाºया सोसायट्या व जागरूक नागरिकांचे म्हणणे होते.मात्र, देवधर समितीने हरित लवादास दिलेल्या अहवालानुसार पर्यावरण ना हरकत दाखला पाहता प्रकल्प राबविण्यास काहीच हरकत नाही, असे त्यात म्हटले आहे. त्यानुसार, या महिन्यात बारावे प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. तेथे भरावभूमी विकसित केली जाणार आहे.दरम्यान, यापूर्वीच महापालिकेने तेथे गोदरेज कंपनीच्या १० कोटींच्या सीएसआर फंडातून प्लास्टिक कचºयापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच महापालिकेने ओल्या कचºयापासूनचा १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे.१० कोटी ७० लाखांचा खर्चच्मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केडीएमसीला भेट दिली. यावेळी बैठकीत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बारावे प्रकल्प सुरू करण्यासाठी एप्रिलची डेडलाइन दिली.च् त्यानुसार प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प तीन हेक्टरवर उभारला जाणार असून, त्यासाठी १० कोटी ७० लाख रुपये खर्च आहे. सौराष्ट्र कंपनीद्वारे या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.