शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कोवीड रुग्णालयाचे काम अंतिम टप्यात, लवकर ठाणेकरांच्या सेवेसाठी होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 6:05 PM

ठाण्यात कोवीड रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्यात आले आहे, गुरुवारी त्याची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हे रुग्णालय लवकरच ठाणेकरांसाठी खुले होणार असून वेळ पडल्यास अन्य ठिकाणी देखील अशा प्रकारचे रुग्णालय उभारता येऊ शकते का? याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे : कोरोना बाधीत रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत या उद्देशाने ठाण्यात १ हजार बेडचे कोवीड रुग्णालय साकार करण्यात आले आहे. अगदी कमी दिवसात हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. यावेळी त्यांच्या समवेत महापालिका आयुक्त विजय सिंघल देखील उपस्थित होते. या रुग्णालयात १ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून येथे १०० आयसीयु बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, तसेच डायलेसीसचे १० बेडही राखीव ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. लवकर हे रुग्णालय कोरोना बाधीत रुग्णांसाठी खुले करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ठाण्यात करोनाची साथ आटोक्यात यावी आणि रु ग्णसंख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने संबंधित यंत्रणांच्या बैठका घेऊन प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने व अधिक प्रभावी पावले उचलण्यासाठी आघाडीवर राहून करोनाविरोधातील या लढाईचे नेतृत्व करत आहेत. तसेच, कोवीड रु ग्णालये व क्वारंटाइन केंद्रांना सातत्याने भेटी देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्रुटी दूर करत आहेत. करोनारु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रु ग्णांवरील उपचारांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी त्यांनी माजिवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार खाटांचे तात्पुरते रु ग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी ५०० खाटा विनाआॅक्सिजन, तर ५०० खाटा आॅक्सिजन पुरवठ्यासह उपलब्ध असतील; शिवाय १०० बेड्सचे आयसीयू युनिट, डायलेसीस सेंटर, तपासणी लॅब आदी अद्ययावत सुविधा देखील येथे असणार आहेत.गेले दोन आठवडे हे रु ग्णालय उभारण्याचे काम दिवस-रात्र सुरू असून गुरु वारी शिंदे यांनी पुन्हा या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, नगरसेवक नजीब मुल्ला, महापालिका आयुक्त विजय सिंघल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘तात्पुरत्या स्वरु पातील हे रु ग्णालय असले तरी जागतिक दर्जाच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच, गरज भासल्यास येथील क्षमता वाढवण्यात येईल, असेही ते म्हणाले. विक्र मी वेळेत या दर्जेदार रु ग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गरज पडल्यास ठाण्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारची रु ग्णालये उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल