शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

घरे तोडल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 9:00 PM

ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे ...

ठळक मुद्देघरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी२७ नोव्हेबरला भिवंडीतील सर्व गोडाऊन बंद करण्याची घोषणाभुकेने मृत्युमुखी पडणाऱ्या जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत हे आपल्या जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे

ठाणे : हरित पट्यातील बिनशेती नसलेली घरे, बांधकामे तोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार भिवंडीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या आदिवासींची घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. हा अन्याय असल्याचा आरोप करून त्याविरोधात शेकडो आदिवासींनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच थांबवण्याची मागणी केली.     जिल्हातील भिवंडी , शहापूर , कल्याण , अंबरनाथ , मुरबाड व ठाणे भागातील आदिवासींची घरे तोडली जात आहेतत. त्याविरोधात शेकडो श्रमजीवी आदिवासींनी एकत्र येऊन हा भव्य मोर्चा काढून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. येथील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर श्रमजीवीच्या या मोर्चाचे सभेत सुरूपांतर झाले. यावेळी उन्हात असलेल्या व्यासपीठावर पंडीत यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, माजी आमदार रूपेश म्हात्रे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष आर.सी. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. या बि-हाड मोर्चात सर्वाधिक संख्येने आदिवासी महिलांचा समावेश आढळून आला. कोंबड्या, बकऱ्या, भांडी, आदीं घेऊन हा बि-हाड मोर्चा श्रमजीवीने काढला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.      भिवंडी तालुक्यात प्रथम झालेल्या या कारवाईत आदिवासींचे घरे मोठ्याप्रमाणात तोडण्यात आली. मात्र भिवंडीतील गोडाऊनही तोडण्याचे आदेश असताना त्यावर मात्र कारवाई न करता प्रथम आदिवासींचे जुने व परंपरागत असलेले घरे तोडण्याची कारवाई प्रशासनाने केली. या अन्याया विरोधात मोर्चा काढून घरे तोडण्याची कारवाई वेळीच बंद करण्याची मागणी या आदिवासीं मोर्चेकरांनी केली. त्यांच्या या मोर्चाव्दारे आता गोडाऊन तोडण्याची कारवाई देखील थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मुळच्या आदिवासीं, गरीब सामान्य असलेल्या एकाही गरिबाला उद्धवस्त होऊ देणार नाही असे पंडित यांनी यावेळी मोर्चेकरांना मार्गदर्शन करतेवेळी स्पष्ट केले. २०१५ पर्यंतच्या बांधकामांना नियमांकुल करण्याची मागणी यावेळी त्यांनी लावून धरली.     भारताच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण होत आहेत असे असताना आज गरिबांची मुलं भुकेने मरत आहेत, यापेक्षा दुर्दैवी काय आहे असा सवाल पंडित यांनी विचारला. भुकेने मृत्युमुखी पडणाऱ्या जगातल्या १०० बालकांमध्ये ५० बालके भारतात आहेत, हे आपल्या जगभर फिरणाऱ्या पंतप्रधानांना सांगितले पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कातकरी समाज आजही वेदनादयी जीवन जगत आहे, कातकरी उत्थान सुरू केले मात्र सर्व काही फक्त कागदावर आहे. २०२० पर्यंत सर्वांना घर देणारे आता लोकांची घरे झोपड्या तोडत आहेत.ही तर लोकशाहीची थट्टा मांडल्याचेही त्यांनी सांगितले.   

      यावेळी रूपेश म्हात्रे यांनी ही मार्गदर्शन करून या अन्याया विरोधात २७ नोव्हेबरला भिवंडीतील सर्व गोडाऊन बंद करण्याची घोषणा केली.या मोर्चात कार्यध्यक्ष केशव नानकर, , उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, रामराव लोंढे, गणपत हिलीम, हिरामण गुळवी, राजेश चन्ने, दशरथ भालके, प्रमोद पवार, जया पारधी, संगीता भोमटे, जयेंद्र गावित, गणेश उंम्बरसडा, उल्हास भानुशाली आदी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMorchaमोर्चा