पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारपुरच्या अणुऊर्जा केंद्र चारच्या देखभाल दुरूस्ती (शट डाऊन) च्या कामाच्या दरम्यान जड पाणी व किरणोत्सर्गीक द्रव्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन काही कामगरांना किरणोत्सर्गची बाधा झाली आहे. मात्र या गळती बाबत अणुऊर्जा केंद्रातील अधिकाऱ्यानी इन्कार करून किरणोत्सर्गाचा डोस अणू ऊर्जा नियामक मंडळीने (एईआरबी) घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीहून कमी असून माप दंडका च्या मर्यादेत असल्याचे सांगितले. अणुभट्टीतून वीज निर्मितिची प्रक्रिया सुरु असतांना अणुभट्टीतील तापमान नियंत्रणात ठेवण्या करीता जड पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असतो सध्या अणुभट्टी क्र . चार च्या देखभाल दुरुस्ती च्या कामासाठी शट डाऊन घेण्यात आला असून हे काम सुरु असतांना एका पाइपमधून किरणोत्सर्गाची मोठी मात्रा असलेले द्रव्य बाहेर पडून त्या ठिकाणी असलेल्या कामगारांना त्यांचा संसर्ग झाला आहे तरीही देखभाल दुरुस्ती मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या घटनेची तारापूर अणू उर्जा केंद्रात आणि परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. गुप्ततेमुळे याबाबतच्या अफवांना सध्या ऊत आला आहे.
कामगारांना झाला किरणोत्सर्ग ?
By admin | Published: May 23, 2017 1:25 AM