शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

युतीच्या राजकारणात कामगार उपाशी

By admin | Published: January 06, 2017 4:30 AM

खंबाटा एव्हिएशन ही कंपनी बंद पडल्यानंतर थकीत पगार आणि भविष्यनिर्वाह निधीसह अन्य देणींसाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांचा लढा आता राजकारणाच्या आखाड्यात पोहोचला आहे

मुंबई : खंबाटा एव्हिएशन ही कंपनी बंद पडल्यानंतर थकीत पगार आणि भविष्यनिर्वाह निधीसह अन्य देणींसाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांचा लढा आता राजकारणाच्या आखाड्यात पोहोचला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंबाटा प्रकरणाचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि भाजपा पुढे सरसावले आहेत. एकीकडे ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कामगार आणि संबंधित कंपन्यांची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कामगारांची देणी त्वरित देण्याचे आदेश खंबाटाला दिले. मुंबई विमानतळावर ग्राउंड हॅण्डलिंग एजंट म्हणून काम करणारी खंबाटा एव्हिएशन ही कंपनी आॅगस्ट २०१६मध्ये तडकाफडकी बंद करण्यात आली. सुमारे २१०० कामगारांचा १० महिन्यांचा पगार, भविष्यनिर्वाह निधी आणि अन्य भत्ते कंपनीने रखडवले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांपासून शिवसेना पक्षप्रमुखांकडे कामगारांनी गाऱ्हाणे मांडले तरी तोडगा निघाला नव्हता. अखेर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रश्नी उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्यावर गुरुवारी सर्व संबंधितांची बैठक ‘मातोश्री’ येथे बोलावून प्रकरण तडीस लावण्याचे आश्वासन उद्धव यांनी दिले. त्यानुसार आज ‘मातोश्री’वर बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कामगारांची देणी देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले. कामगारांनी २६ जुलै २०१६ रोजी थकीत वेतन आणि अन्य भत्ते मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या स्तरावर ७ बैठका झाल्या. यात कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. तसेच कामगारांची देणी देण्यासाठी विमानतळावरील खंबाटा कंपनीचे सहा एन्वेरबेल्ट, एक जनरेटर (जीएफओ), चार कंटेनर ट्रॉली, सात बॅगेज ट्रॉली, टॉयलेट व तीन वॉटर कार आदी साहित्य जप्त करण्यात आले. अधिकची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही अद्याप सुरू असून, विविध बँकांमधील कंपनीची १२ खाती गोठविण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात ही कंपनी परदेशस्थ असून, त्याचे मालकही भारताबाहेरच असतात. कंपनीची अशी विशेष कोणतीही मालमत्ता भारतात नाही. विमानतळावर जी ३५० कार्यालये आहेत ती सर्व विमानतळ प्राधिकरणाची आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन कोण करणार ह मात्र अनुत्तरित आहे. संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा - राष्ट्रवादीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ७ बैठकांचा दावा खोटा असून, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडेच केवळ दोन बैठका झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर यांनी केला. महापालिका निवडणुकीत कामगारांनी रस्त्यावर बोंब ठोकू नये, यासाठीच शिवसेना-भाजपाची धडपड सुरू आहे. खंबाटा एव्हिएशनच्या जागी आलेल्या नव्या कंपनीचे पितळ उघड होऊ नये म्हणून सध्या ‘मातोश्री’वर बैठका सुरू आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या कारभारामुळे खंबाटाने आपला गाशा गुंडाळला आहे. यातील सत्य बाहेर येण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरण पावसकर यांनी केली.