शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

ब्रह्मांड कट्टयावर जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात संपन्न, जलसंवर्धन, देवराई प्रकल्प,  जैवविविधता या विषयावंर माहिती सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 3:59 PM

ब्रह्मांड कट्टयावर जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जलसंवर्धन, देवराई प्रकल्प, जैवविविधता या विषयावंर माहिती सादर केली .

ठळक मुद्देब्रह्मांड कट्टयावर जागतिक वसुंधरा दिन संपन्नजलसंवर्धन, देवराई प्रकल्प,  जैवविविधता या विषयावंर माहिती सादर आपल्या सभोवताली वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे -  प्रा. डॉ. संजय जोशी

ठाणे : ब्रह्मांड सामाजिक-सांस्कृतिक मंडऴा तर्फे ब्रह्मांड कट्टयावर पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने सांज स्नेह सभागृहात जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात तीन विषय घेण्यात आले प्रथम जल संवर्धन हा विषय वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत यांनी त्यांच्या दमदार शैलीत मांडला. दूसरा देवराई प्रकल्पाची सविस्तर माहीती पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांनी दिली.  तर तीसरा विषय जैवविविधता या विषयावर सोमय्या कॉलेजचे मा. प्राध्यापक डॉ. संजय जोशी विशद केला. 

    कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत यांनी जल संवर्धन या विषयाची सुरुवात करताना आज वसुंधरा दिवस चांगला आहे. जगात जेवढ्या भाषा आहेत त्या भाषेत मातृभूमि हा शब्द आहे. आपली पृथ्वी ही मातृभूमि आहे. पर्यावरण व वसुंधरा हे ऐकमेकांना पुरक शब्द आहेत. मानवी जीवनात अशी एकही गोष्ट नाही जी आई आपल्याला पूरवित नाही.  पृथ्वी ही आपली माता आहे. तिने आपल्यासाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. मातेची सेवा करणे हे क्रमपाप्त आहे त्यामुळे वसुंधरा दिन वेगळा साजरा करण्याची आवश्यकता का भासावी असे उलट प्रेक्षकांना विचारले. मातेची रोज सेवा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भागवत यांनी केले. वसुंधरा संजीवनी मंडळ ही स्वयंसेवी संस्था २०१६ पासून ठाणे जिल्ह्यात मुरबाड शहापूर या अदिवासी क्षेत्रात पाणी संवर्धन,  पाणी व्यवस्थापन व ग्रामीण शिक्षण व विकास यासाठी कार्यरत आहे.  

शहापूर मुरबाड या भागात प्रति वर्षी २५०० मि. मि. पाऊस पडून ही नियोजना अभावी सर्व पाणी वाहून जाते व ऑक्टोबर नंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य असते.  पाण्यासाठी महीलांना व मुलांना ३ ते ४ कि. मी. चालावे लागत्,  यामुळे वर्षातील सात महीने शिकणे शक्य नसते. शेती फक्त पावसावरच अवलंबून आहे. पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी इतर गावात भटकणे ही नित्याची बाब झाली आहे. तरुण मुला मुलींमधिये शिक्षण व कौशल्याचा अभाव म्हणून तुटपुंज्या पगारासाठी वणवण. पिढ्यानपिढ्या दुर्लक्षित समाज व दारिद्रय रेषेखालील जीवन. हे सर्व येथील अदिवासी बांधव खडतर जीवन जगतामा आपण शहरातील लोक आणि १३ औद्योगिक वस्त्यांतील कारखाने मात्र मुरबाड, शहापूर परिसरातून भातसा, तानसा, बारवी, वैतरणा इ. धरणातून सातत्याने मिळणाऱ्या पाण्यामुळे प्रगति आणि आर्थिक विकास करीत आहेत. या पाण्यावर त्यांचा अधिकार नाही का?  निश्चित आहे. यासाठी ग्रामीण स्थानिक स्तरावर पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी वनराई बंधारे,  चेक डँम्स,  जुन्या डैम्सचे,  तलावांचे आणि नद्यांचे पुमरुज्जीवन,  जलयुक्त शिवार,  सेंद्रिय शेती,  शेतीपुरक व्यावसायासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करणे व जैविक वैविध्यासाठी उपयुक्त वृक्षारोपण ह् कार्यक्रम हाती घेऊन सातत्याने राबविण्याची नितांत गरज आहे.  नेमक्या याच उद्देशाने वसुंधरा या गावकरी व आदिवासी बांधवांबरोबर कार्य करीत आहे. मागील दोन वर्षांमध्ये वसुंधराच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळाला.  दुबार पिकासाठी पाणी उपलब्ध झाले आणि स्वविकासासाठी काम करण्याचा आत्मविश्वास त्यांच्या मध्ये निर्माण झाला. वर्ष २०१६ मध्ये २२ वनराई बंधारे व वर्ष २०१७ मध्ये ४४ वनराई बंधाऱ्यांची बांधणी. रोटरी व वैयक्ती देणगीतून 3 चेक डैम बांधणी,  वृक्षदानातून ११०० फळझाडांची लागवड व जोपासना,  कनकविरा नदीचे पुनरुज्जीवन करुन ५ गावांना भरघोस फायदा,  महीलांसाठी व युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाला,  शाळकरी मुलींसाठी सायकलींचे वाटप व शिवणयंत्राचे वाटप,  सतत जनजागृति व लोकसहभागातून शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन ही कामे वसुंधरा संजिवनी मंडळाट्यावतीने केली जात आहेत. पर्यावरण दक्षता मंचच्या संगीता जोशी यांनी देवराई याबाबत स्लाइड शो सह सादरीकरण करताना स्पष्ट केले की शेकडो वर्षापासून भारतात देवराईचे अस्तित्वात आहे.  पंरतू सध्या आपण नैसर्गिक साधन संपत्ती आपण ओरबडून घेतोय.  त्यामुळे  जीव साखऴी धोक्यात येत आहे.  देवराई म्हणजे दाट जंगल असते.  देवराई म्हणजे पुर्वी देवळांच्या व देवाच्या नावाने राखुन ठेवलेले जंगल त्यामुळे खुपच जैवविविधचा या मध्ये उपलब्ध असते.  पर्यावरण दक्षता मंचच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील टीटवाला जवळ रुंदा गावात महाराष्ट्र शासनाच्या वन विभागासोबत केलेल्या करारानुसार ५० एकर परिसरात देवराई नावाचा प्रकल्प राबवित आहेत.  त्यामध्ये ११० जातींचे वृक्ष लावण्यात आली आहेत . सध्या तेथे ५० प्रकारचे पक्षी आढलतात.  भारतीय वृक्ष हे जैवविविधतेसाठी पूरक आहेत.  पाच थरांवर जंगल कार्यरत असते.  त्यामध्ये गवत,  झुडपे,  पानगाळ,  वृक्ष इत्यादी प्रकारची साखळी असल्यामुळे मोठे वृक्ष जीव धरु शकत नाहीत. ३३% वनसंपदा असलेला परिसर हा पर्यावरण दृष्ट्या अतिशय सुसह्य असतो असे जागतिक मानांकन मानले जाते.  आता वेगाने होणारे कॉक्रीट्रीकरणामुऴे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.  आपण सर्वांनी आपल्या सभोवताली वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे.  प्रा. डॉ. संजय जोशी यांनी जैवविविधतेचे महत्व विशद करतांना म्हणाले प्राणी सृष्टीमध्ये देखील विविधता असली तरी एकता आहे.  पेशीमध्ये विलक्षण साधर्म असून विविधता आहे.  राष्ट्राचे अर्थ शास्त्र वाढवायचे असेल तर जैवविविधता अधिक असल्यास राष्ट्र संपन्न समजले जाते.  जैवविविधतेचा आपण सर्व ऱ्हास करत आहोत तो आपण सर्वांनी थांबवायला हवा.  ही विनंती रसिकांना जोशी यांनी केली. पाहुण्याचे स्वागत व कार्यक्रमाचे आभार संस्थापक राजेश जाधव यांनी मानले तर पाहुण्याचा परिचय अध्यक्ष महेश जोशी यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेenvironmentवातावरणEarthपृथ्वी