शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण येऊ शकत नाही!

By जितेंद्र कालेकर | Published: June 01, 2018 9:16 PM

एखादा मुलगा वाम मार्गाला गेल्यानंतर त्याच्या मृत्युचाही चटका आई वडीलांना लागू नये. असा प्रकार ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांना अनुभवास मिळाला.

ठळक मुद्देआत्महत्या करणाऱ्या मुलाच्या आईचे हताश उद्गारमुलाच्या खूनानंतर पित्याची आत्महत्याठाण्याचे कासारवडवली पोलीसही आवाक

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ‘मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण आम्हीच आता वृद्ध झालो आहोत, आम्ही तिकडे (ठाण्यात) येऊ शकत नाही, त्यामुळे काय तो तुम्हीच निर्णय घ्या,’ अशी हतबलता शोमीक घोष (३९) ची कोलकता येथे असलेली आई जयश्री बिजोय घोष यांनी कासारवडवली पोलिसांना फोनवरून व्यक्त केली. शोमीकने मुलाचा खून करून स्वत:ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर त्यांनी ही हतबलता व्यक्त केली.लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या संगीत शिक्षक शोमीक यांने बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव’ येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्याने पत्नी दिया आणि ठाणे पोलिसांच्या नावाने प्रत्येकी एक तर घर मालकाच्या नावाने दोन अशा चार वेगवेगळ्या चिठ्ठया लिहून ठेवल्या आहेत. त्याद्वारे शास्त्रीय नृत्यांगना असलेल्या आपल्या दुसºया पत्नीवर प्रचंड प्रेम असून तिही तीन महिन्यांपूर्वी सोडून गेल्याचा विरह सहन होत नाही. याच विरहातून आपण ही आत्महत्या करीत असल्याचे त्याने यात म्हटले आहे. दरम्यान, शोमीक आणि त्याचा मुलगा एकांक्ष (७) या दोघांच्या मृत्यूने कासारवडवली परिसरात एकच खळबळ उडाली. त्याची पत्नी दिया आणि कलकत्ता येथे राहणारे आईवडिल यांचा पोलिसांनी फोन मिळवून त्यांच्याशी बातचीत केली. तेंव्हा पत्नीने काहीशा नाराजीनेच पोलिसांना प्रतिसाद दिला. तर आईने फारसा खेद न व्यक्त करता, ‘ शोमीकच्या मृत्यूचे वाईट वाटले. पण आम्ही वृद्ध असल्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकणार नाही. त्याबाबत काय तो अंतिम निर्णय पोलिसांनीच घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल.’, असे त्या म्हणाल्या. तर त्याच्या मुलाच्याही मृत्यूची पोलिसांनी माहिती दिल्यानंतर जयश्री म्हणाल्या, आम्हाला त्याच्या लग्नाचीही माहिती नाही. २००० या वर्षापासून त्याचा आमचा काहीच संबंध नाही.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. तर वडिलांनी काहीच प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. मुळात, आता आत्महत्या केलेल्या या मुलाने त्याची पत्नी आणि मित्रांनाही आई वडीलांचा मृत्यु झाल्याचे भासविले होते. शिवाय, त्याच्या कर्जबाजारीपणाचा आणि खोटे बोलण्याच्या सवयीचा त्यांनाही त्रास झाला होता. शिवाय, त्याची प्रकृतीही खालावलेली असल्यामुळे त्यांनी मुलाच्या अंत्यविधी किंवा त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी निरुत्साह दाखविला.दरम्यान, त्याची पत्नी दिया हिला माहिती दिल्यानंतर तिने आता त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. उत्तरीय तपासणीची प्रक्रीया आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर पोलीस शोमीक आणि एकांक्ष या पिता पुत्राचे मृतदेह तिच्या ताब्यात देतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी सध्या तरी अकस्मिक मृत्यू अशी नोंद कासारवडवली पोलिसांनी केली आहे. परंतु, जिल्हा शासकीय रुग्णालयातून मुलाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या खुनाचाही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या