ठाणे : आम्ही लेखिका संस्थेच्या संचालिका आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनीला मोहनदास यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्च्यात पती , मुलगा , मुलगी , सून , जावई , नातवंडे आहेत.
सुनीला मोहनदास, पदमा हुशिंग यांसारख्या समविचारी लेखिकांनी यांनी २०१८ मध्ये ठाणे शहरात '' आम्ही लेखिका '' ही संस्था सुरु केली. तसेच संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या मुख्य समिती संचालक पदावर त्या कार्यरत होत्या. या संस्थेच्या माध्यमातून मुंबई , ठाणे , नवी मुंबई या सारख्या विविध भागात ४- ५ संमेलन आयोजित करण्यात आली होती . त्यांचा '' नीलरव '' हा ललित काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे . त्यांना चारोळीसाठी कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखेच्या वतीने चारोळी क्वीन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.
फोटोग्राफी , काव्य , लेखन , चारोळी करणाऱ्या सुनीला या ठाणे शहरातील नीलपुष्प आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद देखील होत्या . विविध क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणाऱ्या सुनिला यांनी आपल्या मितभाषी स्वभावाने ठाणे शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती . त्यांच्या जाण्याने एक हसरं ,स सर्वगुणसंपन्न व्यक्तिमहत्व हरपल्याची भावना आम्ही लेखिका संस्थेच्या कार्याध्यक्षा पद्मा हुशिंग यांनी व्यक्त केल्या .