आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 04:45 AM2018-11-12T04:45:07+5:302018-11-12T04:45:41+5:30

राष्ट्रवादीत आजीमाजीचा रंगलाय वाद : रॅलीत काँग्रेसचाही सहभाग नाही

Writing of the newly appointed office bearers to the agitation, the former office-bearers screamed | आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

आंदोलनाकडे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पाठ तर माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की

googlenewsNext

कल्याण : अंतर्गत गटबाजी कशी रोखायची, असा प्रश्न स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाला पडला असताना शनिवारी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या राफेल विमानखरेदी घोटाळा जागृती रॅलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गटबाजीचे दर्शन घडले. या रॅलीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सहभागी केले जाणार होते; परंतु त्यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पाठ दाखवल्याने रॅलीच्या माध्यमातून छेडण्यात आलेले निषेध आंदोलन चर्चेचा विषय ठरले होते.

एकीकडे पक्षाची सुरू असलेली घसरण आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी गटबाजी, श्रेयवाद आणि वर्चस्ववादात पदाधिकारी गुंतल्याने जनमानसात पक्षाची प्रतिमा ढासळत चालली आहे. याची प्रचीती राज्य व केंद्र सरकारच्या निषेधार्थ छेडलेल्या मौनव्रत आंदोलनादरम्यान माजी पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेले धक्काबुक्की प्रकरण तसेच सुसंवाद सभांमधूनही आली आहे. गटबाजी आणि श्रेयवाद सर्रासपणे सुरू असताना शिष्टाचारदेखील पाळला जात नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये नागरी समस्यांवर पक्ष फारसा रस्त्यावर उतरताना दिसत नाही. केंद्र आणि राज्यपातळीवरील विषय घेऊन पक्षाच्या आदेशाप्रमाणे नावापुरती आंदोलने छेडली जात आहेत. या आंदोलनांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नगण्य उपस्थिती हादेखील चर्चेचा विषय ठरत आहे. याचा प्रत्यय शनिवारी पुन्हा एकदा निषेध रॅलीदरम्यान आला. पश्चिमेतील कोपर रोड स्थानकापासून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप मानपाडा रोडवरील पांडुरंग विद्यालयासमोर झाला. विशेष बाब म्हणजे या रॅलीला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थिती लावली असताना जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि डोंबिवली शहराचे नवनियुक्त अध्यक्ष राजेश शिंदे हे अनुपस्थित राहिले. नवीन कार्यकारिणीत पदे न मिळालेल्या नाराज गटाने या आंदोलनाचे आयोजन केल्याने या नवनियुक्तांनी आंदोलनाला पाठ दाखवल्याचे बोलले जाते. संबंधित पदाधिकाºयांना ऐनवेळी आंदोलनाबाबत कळवण्यात आल्याने त्यांनी सहभागी होणे टाळले, अशीही चर्चा आहे. याबाबत, त्यांच्याशी संपर्क साधला असता दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेल्याने सहभागी होता आले नाही, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. परंतु, या रॅलीच्या निमित्ताने विद्यमान पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी अशी गटबाजी उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी होणार होते; परंतु त्यांचा एकही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी दिसून आला नाही.

सहभागी होणे अपेक्षित होते

नवनियुक्त पदाधिकाºयांमध्ये केवळ डोंबिवली शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही दोनच पदे आजवर घोषित करण्यात आली आहेत. संबंधित रॅली आंदोलनाबाबत जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना पत्र देण्यात आले होते. त्यांनी प्रमुख पदाधिकारी म्हणून आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित होते. पण, ते आले नाही. परंतु, आम्ही काढलेल्या रॅलीला चांगला प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया डोंबिवली शहर राष्ट्रवादी माजी कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांनी दिली.
 

Web Title: Writing of the newly appointed office bearers to the agitation, the former office-bearers screamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.