शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

लिखाणाकडे करिअर म्हणून पाहिले जात नाही

By admin | Published: May 30, 2017 5:24 AM

परदेशात लेखकांना एका पुस्तकाकरिता १० लाख डॉलरचेही मानधन दिले जाते. अशी स्थिती आपल्याकडे नाही. शेतकऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : परदेशात लेखकांना एका पुस्तकाकरिता १० लाख डॉलरचेही मानधन दिले जाते. अशी स्थिती आपल्याकडे नाही. शेतकऱ्याला काही नाही मिळाले तरी चालेल, पण अन्नधान्य स्वस्त मिळाले पाहिजे. त्याच धर्तीवर लेखकाला काही मिळाले नाही तरी चालेल, पण पुस्तके स्वस्त मिळाली पाहिजेत, अशी वृत्ती असल्याने लेखनाकडे करिअर म्हणून कुणी पाहत नाही, अशी खंत सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केली आहे. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यातर्फे सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर यांचा सत्कार आणि मुलाखतीचे आयोजन क रण्यात आले होते. अस्मिता सावंत यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गवाणकर म्हणाल्या की, लेखनात पैसा नाही. त्यामुळे कुणी करिअर करायला जात नाही. ‘लेखक’ ही पदवी नावापुढे लागण्याकरिता खूपजण उत्सुक असतात. लेखक कुणीही होऊ शकतो. किमान एखादे आत्मचरित्र तरी कुणीही लिहू शकते. काही लेखक स्वत: पैसे देऊन पुस्तके छापतात. एखादा लेखक एक पुस्तकतीन वर्षे लिहीत असेल, तर त्याचा पगार कसा काय ठरवणार. पुस्तकांची रॉयल्टी पुस्तक खपल्यावर मिळणार. परदेशात मात्र वेगळी परिस्थिती असते. एक आवृत्ती १० लाखांची असते. त्यामुळे लेखकाला किमान १० लाख डॉलर मिळतात. आजची पिढी ब्लॉग लिहू लागली आहे. ही बाब समाधानकारक असली तरी त्याला व्यापकता नाही.गवाणकर म्हणाल्या की, माझे शिक्षण खेडेगावात झाले. त्या खेड्यातील शाळेत छोट्याछोट्या पुस्तकपेट्या होत्या. त्यातील पुस्तके वाचायला लागले. ज्या गावात जायचे, तेथे प्रथम वाचनालय शोधत असे. त्या काळात वि.स. खांडेकर, फडके वाचले नाही, पण रियासती, बखरी, प्रवासवर्णने खूप वाचली आहेत. कादंबरीपेक्षा चरित्र वाचायला आवडते. लायब्ररीत नोकरीला लागल्यावर आपण केवळ साक्षर आहोत, हे लक्षात आले. मग चार वर्षांत वाचनाचा सपाटा लावला. ज्ञानाचा केवढा प्रचंड विस्तार असतो, हे मला समजले. आत्मचरित्र वाचल्यावर त्यातून माणूस आपल्याला समजू शकतो. मी शेतात कधीच गेले नाही. वडील फौजदार असल्याने गावात आमच्या घराला खूप मान होता. शेतीचा अभ्यास वाचनातून केला. कार्व्हरच्या सगळ्या थेअरी मला समजल्या नाही, पण त्याचा प्रवास हा दारिद्रयातून वर जाताना डोळसपणे प्रयत्न करणारा आहे, हे समजले. आपल्याकडे स्त्रिया संशोधक का नाही, कुटुंबीयांनी त्यांना पूरक वातावरण निर्माण करून द्यावे. स्त्रियांनी संशोधन करणे म्हणजे संसार न करणे, असा समज आहे. संसार व शास्त्रज्ञ या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा साध्य होणार, असा समाजाचा दृष्टिकोन आहे. पण, स्त्रियांना संधी दिल्यावर त्या काय करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत. आपण संकुचितपणे आयुष्याकडे बघतो. त्याकडे विस्तृतपणे पाहिले पाहिजे. म्हणून, आपण लेखन केल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ची ताकद ओळखणे, तिचा पुरेपूर कस लावणे आणि तडजोड न करणे, या लेखकाकरिता खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असे नमूद करून गवाणकर म्हणाल्या की, याचा प्रत्येकाने जीवनात अवलंब केला पाहिजे. ‘एक होता कार्व्हर’ही काल्पनिक कादंबरी असती, तर तुमच्या मनाला ती भावली नसती. ते वास्तव आहे, म्हटल्यावर तुम्हीही ते इतरांना वाचण्याची शिफारस करता. कादंबरीला मी कमी लेखत नाही. पण, चरित्र वाचकांना अधिक प्रेरित व आकर्षित करतात. वाचनाची सवय लावापालकांचा मुलांशी संवाद कमी झाल्याबद्दल खंत व्यक्त करत गवाणकर म्हणाल्या की, पालक मुलांना किती वेळ देतात, हे महत्त्वाचे आहे.वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. घरात पुस्तके असतील, तर मुले लवकर वाचायला लागतील. आजीआजोबाचे काम मुलांना वाचायला लावणे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.