प्रज्ञा म्हात्रे / ठाणेमकरसंक्रांतीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्यामुळे उपहारगृहापांसून घरगुती पदार्थ मिळणाऱ्या दुकानांपर्यंत आणि मॉलपासून हातगाड्यापर्यंत तीळगुळांच्या खरेदीला वेग आला आहे. नोटाबंदीमुळे तीळगुळांचे दर यंदा जैसे थे असल्याने चोखंदळ खवय्याच्या खिशाला यंदा फटका बसलेला नाही. यंदा महापालिकांच्या निवडणुका असल्याने जागोजागी होणाऱ्या हळदी-कुंकू समारंभासाठी तीळगुळाचे, हलव्याचे तुफान बुकींग सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीचा अंदाज मागे टाकून यंदा ठाणे शहरात ५०० टन लाडूंची उलाढाल होईल, असा दुकानमालकांचा अंदाज आहे.संक्रांतीनिमित्त रेडीमेड तीळगुळांची मागणी गेली काही वर्षे वाढते आहे. त्यामुळे सर्वत्र तीळगूळ, हलव्याची विक्री सुरू आहे. नेहमीपेक्षा यंदा तिळगुळांच्या खरेदीत तिप्पट वाढ झाली आहे. निवडणुका असल्याने प्रभागांत हळदी-कुंकू समारंभ आयोजित केले जातात. या समारंभासाठी लाडू आणि हलव्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्याच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. एक लाडू आणि हलवा असे पाकीट यासाठी तयार केले जात असल्याचे अशा वस्तू हमखास पुरविणारे संजय पुराणिक यांनी सांगितले. निवडणुकांच्या दंगलीमुळे यंदा तिळगुळाया लाडवांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार असल्याचे चित्र आहे. दरवर्षी कच्च्या मालात वाढ झाली, की तिळाचे, गुळाचे, चिक्कीच्या गुळाचे आणिलाडूचे दर वाढतात. यंदा प्रथमच लाडवांचे दर वाढलेले नाहीत. नोटाबंदीचा हा परिणाम असल्याचे निरीक्षण अन्य दुकानमालक केदार जोशी यांनी नोंदविले.हलव्याच्या दागिन्यांचे बुकिंग सुरूसंक्रांतीला लहान मुलांना, नववधूंना हलव्याचे दागिने घालून नटवले जाते. या दागिन्यांचे नाजूक, कलाकुसरीचे सेट बाजारात आले असून त्यांचेही बुकिंग सुरू आहे. २०० रुपये प्रति सेट अशी त्यांची किंमत आहे. ज्येष्ठांसाठी गोडवाज्येष्ठ नागरिकांसाठी मऊ लाडूदेखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांनाही वाढती मागणी आहे. कमी गोड, साखर नसलेले लाडूही काही दुकानदार आॅॅर्डरनुसार बनवून देत आहेत. खवा-तिळाची बर्फी : संक्रातीला नवनवीन पदार्थ बनवण्याकडे आमचा कल असतो. यंदा प्रथमच खवा-तिळाची बर्फी खवय्यांसाठी बनविण्यात आल्याचे पुराणीक यांनी सांगितले. या बर्फीलाही खवय्यांचा उत्तम प्रतिसाद आहे. तिचा दर ४०० रुपये किलो आहे. गूळपोळीची खरेदी अधिक : गूळपोळी आणि तीळगुळाची पोळीही सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहे. या पोळ््यांना चांगली पसंती आहे. या पोळ््या अधिक दिवस टिकत असल्याने रथसप्तमीपर्यंत ती मागणी सतत वाढत राहते, असेही दुकानदारांनी सांगितले. लोण्याची मागणीही वाढती : थंडी वाढू लागली आणि संक्रांतीचा काळ जवळ आला की दरवर्षी लोण्याची खरेदी दुप्पट होते. सध्या मागणी सुरू झाली आहे, पण ती अजून दुप्पट झालेली नाही. भोगीनिमित्त तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत लोण्याची खरेदी होते आहे. अर्थात लोण्याचे पाव किलोचे पॅकच सर्वाधिक खरेदी केले जात असल्याने विक्रेत्यांनी तशीच तयारी केली आहे.
निवडणुकांमुळे यंदा वाढतोय तीळगुळाचा गोडवा
By admin | Published: January 13, 2017 6:59 AM