ठाणे : येत्या पावसाळ्यात समुद्राला पुन्हा उधाण येणार आहे. यामध्ये सर्वात मोठ्या उंचीची लाट ही १ सप्टेंबर २०१९ रोजी येणार असून ती ४.९१ मीटर उंचीची असणार आहे. तर, पावसाळ्याच्या काळात चार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या १९ दिवसांत दोन वेळा समु्रदात लाटा उसळणार आहेत.समुद्राच्या उधाणभरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडला तर काय होते, हे मुंबईकरांनी २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीत अनुभवले आहे. त्यामुळे तेव्हापासून एकूणच आपत्ती व्यवस्थापनात समुद्रातील उधाणभरतीच्या वेळा लक्षात घेतल्या जाऊ लागल्या आहेत.अशी भरती आणि अतिवृष्टी असा योग जुळून आला की, ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून मुंबईसह ठाण्यासारख्या शहरांची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असते.ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी येत्या पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पाण्याच्या उधाणभरतीचे दिवस आणि वेळा सांगितल्या आहेत. तसेच यादिवशी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दर्शवलेली उंची ही भरतीच्या पाण्याची असते, समुद्राच्या लाटांची नसते, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रशासनानेही आत्तापासूनच याबाबत काळजी घेणे महत्वाचे ठरणार आहे.>महिना (तारीख) वेळ भरतीची उंची मीटरमध्ये१७ जून दुपारी १२.१८ ४.५१२ जुलै ११.५२ ४.५४३ जुलै १२.३५ ४.६९४ जुलै १.२० ४.७८५ जुलै २.०६ ४.७९६ जुलै २.५२ ४.७४७ जुलै ३.४१ ४.६०३१ जुलै ११.३१ ४.५३१ आॅगस्ट १२.१६ ४.७४२ आॅगस्ट १२.५९ ४.८७३आॅगस्ट १.४४ ४.९०> महिना (तारीख) वेळ भरतीची उंची मीटरमध्ये४आॅगस्ट दुपारी २.२९ ४.८३५आॅगस्ट दुपारी ३.१४ ४.६५२९आॅगस्ट सकाळी ११.११ ४.५३३०आॅगस्ट सकाळी ११.५३ ४.७७३१आॅगस्ट दुपारी १२.३४ ४.९०रात्री १२.४७ ४.६११सप्टेंबर दुपारी १.१५ ४.९१उत्तररात्री १.३३ ४.६७२सप्टेंबर दुपारी ३.५८ ४.७९उत्तररात्री २.१९ ४.५८३ सप्टेंबर दुपारी २.४१ ४.५४
यंदाच्या पावसाळ्यात १९ दिवस असणार उधाणाचे, २२ वेळा उसळणार लाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 5:49 AM