ठाणे : राख्यांचा बाजार सलग दुसऱ्या वर्षी थंडावला आहे. यावर्षी राख्यांमध्ये नावीन्य नसल्याचे मत ठाणेकरांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे, महागाईमुळे ग्राहक नवीन प्रकारांच्या राख्यांपेक्षा स्वस्त राखीबद्दल विचारणा करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.रक्षाबंधन आठवडाभरावर आले आहे. या निमित्ताने ठाण्यात दरवर्षी विविध प्रकारच्या राख्या येत असतात. रस्त्याच्या कडेला, गिफ्ट शॉप्समध्ये, बाजारपेठांमध्ये, हातगाड्यांवर राख्यांची विक्री होत असल्याचे दिसते. काही दिवसांपासून राख्या बाजारात आल्या असल्या, तरी या राख्यांमध्ये फार नावीन्य दिसत नसल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या मताला दुकानमालकांनीही दुजोरा दिला आहे. गेल्यावर्षी जीएसटीच्या भीतीमुळे ३० टक्के राख्या बाजारात आल्या होत्या. विक्रेत्यांना विचारले असता, बाजारात नवीन प्रकार आलेच नसल्याने आम्ही विक्रीसाठी नवीन राख्या ग्राहकांसाठी उपलब्ध करू शकलो नाही, असे ते म्हणाले. ठाण्याच्या बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर पारंपरिक आणि नियमित राख्याच दिसत आहेत. महागाईचा परिणाम राख्यांच्या खरेदीविक्रीवर झाला आहे. यंदा पारंपरिक राख्यांचीच चलती आहे, असे विक्रेता आकाश बोडके याने सांगितले. महिनाभर आधीच राख्या बाजारात आल्या तरी खरेदीसाठी लोकांमध्ये उत्साह नाही. राख्यांमध्ये यंदाही मीनाकारी, मोत्यांची, रुद्राक्ष, इव्हील आय, डायमण्ड, गोल्ड प्लेटेड अमेरिकन डायमण्डची राखी, सिल्व्हर प्लेटेड, गोल्ड प्लेटेड विथ चंदन, डायमण्डमध्ये ओमची राखी, रुद्राक्ष राखी, क्रिस्टल रुद्राक्ष राखी, क्रिस्टल इफेक्टची ब्रास बिट्स, कुंदन राखी असे प्रकार असून यात कलशमध्ये असलेली राखी विशेष लक्ष वेधून घेत आहे. ही राखी ८० रुपये दराने मिळते आहे. या राख्यांची किंमत १० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे.परदेशातील भावासाठी राखी पॅकेजपरदेशात पाठवण्यासाठी खास राखी पॅकेज उपलब्ध आहे. यात राखीबरोबर भेटकार्ड आणि लिफाफा देण्यात येतो. या राखीची किंमत ८० रुपये आहे. या राखीची खरेदी एक महिन्यापूर्वीपासूनच सुरू झाली आहे.इमोजीजची राखी व्हॉट्सअॅपमध्ये असलेल्या वेगवेगळ्या इमोजीजच्या राख्यादेखील बाजारात आल्या आहेत. राख्यांवर स्माइलींचे विविध प्रकार आहेत.बच्चेकंपनीसाठी डोरेमन, छोटाभीम : बच्चेकंपनीसाठी नेहमीप्रमाणे कार्टुन राख्या बाजारात आल्या आहेत. त्यातही नावीन्य नाही. नेहमीप्रमाणे छोटाभीम, डोरेमनच्या राख्या प्रामुख्याने आहेत. स्पायडरमनची राखी खास पाउचमध्ये आली आहे. त्या पाउचला स्पायडरमनचा लूक देण्यात आला आहे. ही राखी ४० रुपयांना आहे. त्याचप्रमाणे साईबाबा, गणपती, कृष्णा, मोराची राखीही बाजारात उपलब्ध आहे.पारंपरिक गोंडा राख्यांना पसंतीलाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, नारंगी अशा विविध रंगांच्या गोंडा राख्यांना ग्राहकांची कायम पसंती आहे. महिलांमध्ये डायमण्ड राख्यांचीही क्रेझ असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यंदा स्वस्तातल्या राख्यांकडेच कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 3:48 AM