लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिक्षकांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा व जिल्हा परिषद प्रशासनाचा तसा डोकेदुखीचा विषय आहे. परंतु, तरीही यंदा या शिक्षकांच्या बदल्यांऐवजी केवळ शाळांचे केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी संवर्गाच्या बदल्या हाती घेतल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत. शाळा सुरू होण्याआधी या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या बदल्यांसाठी पात्र ठरवले आहे. यासाठी ज्येष्ठता सूचीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, एनकेटी सभागृहात जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना एकत्र बसवून त्यांच्यासमोर पारदर्शक पद्धतीने बदलीचे ठिकाण त्यांच्या पसंतीने दिले जाईल. यास समुपदेशन बदली प्रक्रिया असे संबोधले जाते. या पद्धतीमुळे कोणावरही अन्याय न होता त्यांच्यासमक्ष रिक्त शाळा, ठिकाणांची यादी स्क्रीनवर दाखवली जाईल.
यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत
By admin | Published: May 11, 2017 1:58 AM