मुरबाड : महाराष्ट्रातील प्रसिध्द खांबलिंगेश्वर देवस्थान म्हसोबा यात्रेचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. बुधवार वगळता चार दिवस यात्रेला भाविकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आंध्रप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात येथील अनेक व्यापारी ब्लँकेट, चादरी, घोंगडी, संसारपयोगी भांड्यांची दुकाने थाटली आहेत. मात्र दरवर्षीपेक्षा ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने अवघी तीस टक्के विक्री झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले. उर्वरित काळात तरी भाविक येतील अशी आशा व्यापाºयांना आहे.खांबलिंगेश्वर देवाची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला भरते. यात्रेतील भाविकांना पुरेशा सोईसुविधा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असते. खांबलिंगेश्वराचे दर्शन भक्तांना व्यवस्थित व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती कडून विशेष काळजी घेतली जाते. म्हसोबाचे दर्शन घेण्यासाठी व घोंगडी, चादर, ब्लँकेट, सतरंजी, बेडशीट यासह भांडी, कोयते, कुºहाड, विळा, पळी , झारा, कालथी, पायली, शेर, पावशेर तसेच प्लास्टिकची बादली, टफ, घमेली, स्टूल , यासह प्रसाद म्हणून लाह्या, पेढे, साखरफुटाणे, बत्ताशे, कंदीपेढे या वस्तूंची विक्री यात्रेत होते.मौत का कुआ, आगगाडी, आकाशपाळणे असे मनोरंजनाचे खेळ यात्रेत आले आहेत. बुधवार व शुक्र वार वगळता गर्दी कमी राहिल्याने विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांची चार दिवसात जेमतेम तीस टक्केच विक्री झाल्याने अनेक व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे घरगुती गॅस धारकांना सिलिंडर मिळण्यास अडचणी येत आहेत. मात्र यात्रेत मिठाई तयार करणारे व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर वापरत आहेत.बंदोबस्ताचा आढावाशुक्रवारी यात्रेचा पाचवा दिवस असल्याने ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्यासह म्हसा येथे भेट देऊन बंदोबस्ताची माहिती घेतली.यावेळी त्यांनी यात्रेत कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी भाविकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे अवाहन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष दशरथ पष्टे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.म्हसा यात्रेत कोयते, गुºहाळी, विळे, पायली आदी साहित्य विक्र ीला आणले आहे. मात्र जेमतेम विक्र ी झाली आहे. जागेचे भाडेही वसूल झालेले नाही.- शोभा पवार, विक्रेतेदोन लाखाची खेळणी व इतर साहित्य विक्र ीसाठी आणले आहे. मात्र पाच दिवसात वीस हजाराची विक्र ी झाली आहे .- सद्दाम हुसेन, विक्रेतेदहा बंडल ब्लँकेट, चादर, सतरंजी विक्र ीसाठी आणले आहे. मात्र पाच दिवसात चार बंडलची विक्र ी झाली आहे. दरवर्षी पेक्षा अतिशय कमी विक्री झाली आहे.- रु पसिंग बंजारा, विक्रेतेदोन लाख रु पयांचे ब्लँकेट, चादर, सतरंजी व इतर कपडे विक्रीसाठी आणले. मात्र पाच दिवसात ४० हजाराची विक्र ी झाली आहे.- सलमान, विक्रेतेदोन लाखाचे पोळपाट, लाटणे, रवी, काठवळ, धोपाटणे विक्रीला आणले आहे. मात्र पाच दिवसात ५० हजाराची विक्र ी झाली आहे.- नसीर तांबोळी, विक्रेते
म्हसाच्या यात्रेवर यंदा मंदीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:07 PM