शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

ठाण्यातील कुख्यात गुंडाची येरवडा तुरुंगात रवानगी, गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 7:53 PM

ठाण्यातील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याच्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली

ठाणे, दि. 20 - ठाण्यातील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याच्यावर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्याची शनिवारी एक वर्षासाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.गण्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी उकळणे, अपहरण, दरोडा आणि मारहाण करणे असे गंभीर स्वरूपाचे २४ गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळेच पोलिसांच्या अभिलेखावरील ‘टॉप-२०’ गुन्हेगारांच्या यादीत त्याचा समावेश होता. त्याच्यावर यापूर्वीही ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई झाली होती. तरीही, त्याच्याकडून गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर सणांच्या काळात परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्याच्यावर एमपीडीएबरोबरच प्रथमच दुस-या जिल्ह्यात स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला ३० जुलै २०१७ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. न्यायालयीन कोठडीमुळे त्याची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. तो जामिनावर सुटण्यापूर्वीच त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव वर्तकनगर पोलिसांनी तयार केला होता. तो प्रस्ताव वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आयुक्तांकडे पाठवला होता. गण्याची लोकमान्यनगर परिसरातील दहशत आणि अगदी नगरसेवकालाही ठार मारण्याची त्याने दिलेली धमकी या सर्वच पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयीन कोठडीत असतानाच आयुक्तांनीही त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यामुळेच त्याची आता ठाणे कारागृहातून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.गण्याच्या अटकेनंतर लोकमान्यनगरचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, राधाबाई जाधवर आणि वनिता घोगरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वागळे विभागाचे सहायक आयुक्त महादेव भोर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरधर यांचा सत्कार केला होता. त्याच्यावरील स्थानबद्धतेच्या कारवाईचेही नगरसेवकांसह स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.