शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

BJP MLA Ganpat Gaikwad होय, मीच गोळीबार केला, मला पश्चाताप नाही, आमदार गणपत गायकवाड यांची कबुली, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 5:54 AM

Ganpat Gaikwad (Ulhasnagar Firing Latest News): आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. 

भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे. शिविगाळ आणि वादावादीचं पर्यावसान गोळीबारात झालं असून, या दरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. 

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्येच ही घटना घडली आहे. दरम्यान, या गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती. त्यामुळे  माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांनी हिंमत करून मला अडवले. मात्र त्यांना जिवे मारण्याचा माझा हेतू नव्हता. पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.  

तसेच गायकवाड यांनी शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले. 

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबीनमध्ये द्वारली गाव येथील जमिनीवरून वाद होऊन कल्याण शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMahesh Gaikwadमहेश गायकवाड