ठाणे : कोरोनाग्रस्त जग आज सातवा जागतिक योग दिन साजरा करीत आहे. त्यावर उपाय म्हणून लस आपण मान्य करूया. कोरोना-१९ या महामारीवर मात करण्यासाठी नियमित योगाभ्यास हा रामबाण उपाय आहे. त्यायोगे आपल्या शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्तीच कोरोनाला नामोहरम करेल. म्हणून प्रतिकारशक्ती वाढीसाठी योगाभ्यास अत्यावश्यक आहे , असे मनोगत ठाण्याचे ज्येष्ठ योगप्रशिक्षक प्रवीण धुरी यांनी व्यक्त केले.
सातव्या जागतिक योग दिनानिमित्ताने श्री आनंद भारती समाज, ठाणे (पूर्व ) व श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'योगाची आवश्यकता' या विषयावर शिबिरात ते बोलत होते. यात पंधरा साधक सहभागी झाले. त्यात रमेश कोळी, प्रमोद नाखवा, मीनाक्षी कोळी व स्वप्नाली गुजर या सहायक प्रशिक्षकांचाही सहभाग लाभला.
---------