शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

‘स्ट्रीट आर्ट’ला लाभले तरूण कलावंतांचे पंख

By admin | Published: March 16, 2017 2:56 AM

रस्त्यावरुन जाताना कधीकाळी नजरेस पडणाऱ्या, आता काळाच्या ओघात लुप्त होत चाललल्या ‘स्ट्रीट आर्ट’ला नवसंजीवनी देण्यासाठी ठाण्यातील तरूण पुढे आले आहेत.

ठाणे : रस्त्यावरुन जाताना कधीकाळी नजरेस पडणाऱ्या, आता काळाच्या ओघात लुप्त होत चाललल्या ‘स्ट्रीट आर्ट’ला नवसंजीवनी देण्यासाठी ठाण्यातील तरूण पुढे आले आहेत. ही कला पुनरूज्जीवित करण्याचे काम कळवा येथील कवीज क्रिएटीव्ह आर्टने सुरू केले असून कळवावासीयांना तिची झलक पाहायला मिळाली. निमित्त होते, शिवजयंतीचे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य चित्र रेखाटण्यात आले. सूरज परदेशी यांच्या पुढाकाराने रेखाटलेली ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची, कलारसिकांची एकच गर्दी झाली होती. एखाद्या उद्यानाच्या बाहेर, पदपथाच्या कडेला किंवा मध्यभागी खडू हातात घेऊन रस्त्यावर चित्र रेखाटताना पूर्वी कलाकार सहज नजरेस पडत असे. देवदेवतांचे चित्र, राष्ट्रपुरूष किंवा एखादे आगळेवेगळे आकर्षक चित्र हे कलाकार रेखाटत बसलेले पाहायला मिळत. काळ बदलला, तसतशी ही कला हरवत गेली. ही कला पुन्हा लोकांसमोर यावी या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी ‘कवीज क्रिएटिव्ह आर्ट’ने दीड हजार चौरस फुटांची ही स्ट्रीट आर्ट साकारली होती. यात ‘कौटुंबिक हिंसाचार’ हा विषय हाताळला होता. एखादे औचित्य साधत ती कला आम्ही लोकांसमोर आणतो, असे परदेशी सांगतात. शिवजयंतीनिमित्त २५० चौरस फुटांचे शिवाजी महाराजांचे चित्र या तरूण कलाकारांनी रेखाटले. याआधी काढलेल्या ‘स्ट्रीट आर्ट’ मध्ये त्यांनी केवळ खडू, कोळसा आणि गेरुचा वापर केला होता. यावेळेस १०० रंगीबेरंगी खडू, कोळसा, गेरु यांच्या साहय्याने महाराजांचे चित्र रेखाटले. सकाळी साडेसात वाजल्यापासून सूरज यांच्यासह ज्योती परदेशी, मयुरेश तायडे, प्रांजल गावडे, दीपा शेषाद्री, मेघना जाधव या कलाकारांनी आपल्या कलेतून अवघ्या दीड तासांत हे चित्र साकारले. (प्रतिनिधी)