उल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरातील एका चायनीज गाडीवर काम करणाऱ्या सैयद नौशाद शेख गुरुवारी सायंकाळी साडेपाच्या दरम्यान चायनीज गाडीवर काम करीत होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी सैयद यांच्यावर चाकूने हल्ला करून धूम ठोकली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------
गावठी दारू जप्त
उल्हासनगर : कॅम्प नं ४ गुरू सत्संग दरबरच्या परिसरात गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेसह विठ्ठलवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. आरती प्रेमानी नावाच्या महिलेकडून चार हजार १८० रुपये किमतीची गावठी दारू व इतर साहित्य जप्त करून तिच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
------------------------
तरुणास मारहाण
उल्हासनगर : नीरज चावला याचे मित्र जयकुमार शर्मा, कुशल, जतीन हे शनिवारी रात्री एक वाजता इंदिरा गांधी मार्केट परिसरातून जात होते. त्यावेळी हरेश याने जयकुमार याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. तसेच इतरांना हरेश व कुणाल यांनी मारहाण केली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.