लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: क्षुल्लक कारणावरून खंडोबा कांबळे आणि स्वप्नील वाघमारे या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यातूनच शामेल डेव्हिड (२१, रा. साईनगर, कासारवडवली, ठाणे) या रिक्षाचालकाचा रूपेश वाघमारेसह पाच जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी चौघांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी दिली.घोडबंदर रोडवरील साईनगर भागात शामेल याचा मित्र खंडू कांबळे याच्यासोबत रूपेश वाघमारे तसेच इतरांशी ५ जानेवारी २०२२ रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास सिगारेट पिण्यावरून वाद झाला होता. याच वादातून ६ जानेवारी रोजी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास कांबळे आणि वाघमारे या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या धूमश्चक्रीमध्ये शामेल याला चाकू तसेच प्लास्टिकच्या डब्याने त्यांनी मारहाण केली. याच मारहाणीत रूपेश याने शामेलच्या पोटात आणि पाठीवर चाकूचे वार केले. तर स्वप्नील वाघमारे, मुकेश वाघमारे, कल्पेश माकणेकर आणि नरेंद्र मोरे यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याच दरम्यान, शामेल यांच्या मुलाचा मित्र राज वंजारी (रा. वर्तकनगर, ठाणे) याच्यावरही चाकूने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. पोटात चाकूचे वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या शामेल याला तातडीने त्याचे वडील सोलोमन डेव्हिड यांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. तर वंजारी याला अन्य एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींपैकी रूपेश, स्वप्नील, मुकेश आणि कल्पेश या चौघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली.
सिगारेट पिण्यावरून झालेल्या हाणामारीत तरुणाचा चाकूने भोसकून खून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 12:12 AM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : क्षुल्लक कारणावरून खंडोबा कांबळे आणि स्वप्नील वाघमारे या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यातूनच शामेल ...
ठळक मुद्देचौघांना अटककासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा