शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:38 AM

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील धसई, म्हसा, सरळगाव या ठिकाणी साई सेवा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ही ...

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील धसई, म्हसा, सरळगाव या ठिकाणी साई सेवा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ही संस्था दहावी, बारावी पास तरुणींना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३० ते ४० हजार उकळते. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी संस्थेची पाहणी केली. ही संस्था बोगस असून केवळ आरोग्यविषयक ज्ञान देते. त्यांना कोणत्याही प्रकारे नर्सिंग अभ्याक्रम प्रमाणपत्र किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

मुरबाड तालुक्यात सहा ते सात वर्षांपासून नाशिक येथील जयवंत गायकवाड हे दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणींसाठी ही संस्था चालवत आहेत. ३० ते ४० हजार रुपये घेऊन सहा महिने प्रशिक्षण दिले जाते. नंतर दीड वर्षे नाशिक येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थीं म्हणून पाठविले जाते. सध्या कोरोनामुळे सर्व क्लासेस बंद असताना येथे कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता क्लास घेतले जातात. प्रशिक्षणासाठी पाठवल्यानंतर २४ तास ड्युटी लावली जाते. मात्र प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींना दरमहा संबंधित हाॅस्पिटलकडून फक्त एक हजार रुपये स्टायपेंड दिले जाते. संस्था या प्रशिक्षणार्थींकडून जबरदस्तीने वार्षिक फी व परीक्षा शुल्क आकारते. प्रवेश घेताना ज्या मुलींना आई किंवा वडील नाहीत त्यांना आम्ही दत्तक घेतो. त्यांना सरकारी नोकरी शंभर टक्के लावण्याची हमी देतो. तसेच त्यांच्या लग्नाला ५० हजारांची मदत देतो अशा प्रकारची आमिषे दाखविली जातात. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षांत या संस्थेने एकाही तरुणीस सरकारी नोकरी दिली नाही किंवा दत्तक घेतलेले नाही.

अंकिता राऊत या मुलीने वडिलांच्या निधनामुळे दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला. ती प्रशिक्षणासाठी नाशिक येथे असताना १७०० रुपये परीक्षा शुल्क भरण्यासाठी सांगितले, मात्र पैसे नसल्याने नाशिकहून मुरबाड येथे पाठविले. तिच्या आईने पैशाची तजवीज करून मुलीला पैसे भरण्यासाठी मुरबाड येथील संस्थेत पाठविले असता १७०० रुपयांची पावती दिली नाही. तसेच परीक्षा कुठे होईल याची माहिती दिली नाही. त्यामुळे तिला आपली फसवणूक होत आहे असे समजले असता नातेवाइकांनी डॉ. बनसोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संस्थेची पाहणी केली असता या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीस कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.