ठाणे : आॅल इन वन संस्थेतर्फे आयोजित केलेला आपला आगरी महोत्सव हजारो रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. या महोत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या माणुसकीची शैक्षणिक भिंत, ‘चला शिकू या, चला शिकवू या’, एक वही एक पेन अभियानाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यंदाच्या महोत्सवाचे तिसरे वर्ष होते. पाचही दिवस महोत्सव हाऊसफुल्ल प्रतिसादात पार पडला. या अभियानाला लोकमतच्या वतीनेही शैक्षणिक साहित्य देण्यात आले. मोठ्या प्रमाणात जमलेले सर्व साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, असे संस्थेचे मयूरेश कोटकर यांनी सांगितले. प्रेक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, तर लहानग्यांनी बाळनगरीचा आनंद लुटला. रंगमंचावर झालेल्या कार्यक्र मात महिला स्पेशलमध्ये दक्षता समिती कोनगाव महिला मंडळाने राजकारणावर केलेली नाटिका विशेष भाव खावून गेली. तसेच वळच्या सरपंच नंदिनी भोईर यांनी आपल्या पथकासह महिलांच्या सक्षमीकरणावर आधारित नाटिका सादर केली. शाहीर नंदेश उमप यांची कवी अरु ण म्हात्रे यांनी मुलाखत घेतली. शशांक पाटील यांच्या ‘हीच खरी आगऱ्यांची दौलत’ या आॅर्केस्ट्रातील पारंपरिक गाण्यांवर सर्वांनीच ठेका धरला. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांना खा. कपिल पाटील, आयपीएस अधिकारी रवींद्र शिसवे, बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या हस्ते यंदाचा लोकनेते दि.बा. पाटील पुरस्कार प्रदान केला. (प्रतिनिधी)
आपला आगरी महोत्सव उत्साहात संपन्न
By admin | Published: January 13, 2017 6:33 AM