उल्हासनगर : शिवसेनेच्या हातातून उल्हासनगर महापालिकेची सत्ता जाताच शिवसेनेचे शहर युवा अधिकारी धीरज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. निवडणुकीनंतर शिवसेनेला हा दुसरा धक्का आहे.भाजपाने ओमी टीम व साई पक्षाच्या साथीने पालिकेत सत्ता मिळवली. भाजपाने शहरातील शिवसेनेची ताकद मोडीत काढून साम्राज्य वाढवणे सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांना टार्गेट केले आहे. शिवसेना युवासेनेचे शहर अधिकारी धीरज ठाकूर यांचे वडील विनोद ठाकूर शिवसेनेचे नेते आहेत. यापूर्वी त्यांनी उपमहापौरपदही भूषवले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी न लागल्यामुळे त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे बोलले जात आहे.युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील म्हणून धीरज ठाकूर ओळखले जात. त्यांनी अचानक राजेश कणसे व अन्य कार्यकर्त्यांसह खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रकारामुळे युवासेना व शिवसेनेत खळबळ उडाली आहे. भाजपाने शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी पदाधिकारी फोडण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)युवासेनेची आज तातडीची बैठकयुवासेनेची पडझड थांबवण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी तातडीने रविवारी युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.
युवासेना अधिकारी भाजपात
By admin | Published: April 09, 2017 2:39 AM