भिवंडी - केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर च्या किमती मध्ये पन्नास रूपयांची दरवाढ केल्याने त्याचे तीव्र पडसाद समाजातून उमटत आहेत. भिवंडीत युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभिनव आंदोलन करण्यात आले. देवजीनगर येथे झालेल्या या आंदोलनात महिलांनी गॅस सिलेंडरचा वापर बसण्यासाठी करीत चुलीवर जेवण बनवीत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला आहे.
गॅस दरवाढी मुळे पुन्हा एकदा महिलांचे स्वयंपाक घरातील अर्थकारण बिघडले आहे.उज्वल योजना राबवून गॅस सिलेंडर सुरवातीला मोफत दिले पण आता गॅस दरवाढ केल्याने महिलांना पुन्हा एकदा चुलीवर जेवण बनविण्याची वेळ आली असल्याने महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळणार आहेत अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली आहे.या आंदोलनात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्या राणी अग्रवाल,निलेश जेडगे,दिनेश प्रजापती,साईनाथ चिल्का,संदीप यादव,राजन मलेशिया यांसह अनेक महिला युवक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.