डोंबिवली- ट्रान्सडेंटल मेडिटेशन, सिध्दी व योगिक फ्लाईंग यांच्या जोरावर आपण कठीणात कठीण ध्येय साध्य क रू शकतो. या योगाच्या माध्यमातूनच आपल्याला या विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे, असे मत जपानचे माजी पंतप्रधान युकिओ हातोयामा यांनी व्यक्त केले. डोंबिवलीतील वैशालीताई जोंधळे विद्यासमूहातर्फे गेल्या दोन वर्षापासून जगभरातल्या अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने मेडिटेशन व फ्लाईंग योगा सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शिकविण्यात येत आहे. यावेळी विद्याथ्र्याना मार्गदर्शन करताना हातोयाम बोलत होते.महर्षी महेश योगी यांच्या महर्षी जागतिक शांतता प्रकल्पाअंतर्गत हातोयामा हे जगभर ट्रान्सडेंटल मेडिटेशन या मूळ भारतीय परंतु आता जगाने मान्य केलेल्या योग ध्यान धारणा शास्त्रचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यानुसार मंगळवारी ते डोंबिवलीत आले होते. सुमारे दोनशे विद्याथ्र्यानी ध्यानधारणा करून फ्लाईंग योगाची प्रात्याक्षिके दाखविली. या योगामुळे विद्याथ्र्यामध्ये अमूलाग्र बदल दिसून येत आहे. यावेळी व्यासपीठावर होतायाम यांच्या पत्नी मियुकी, हॉलंडचे जेन हॉकसन, संजय चेऊलकर, विद्यासमूहाच्या प्रमुख वैशालीताई जोंधळे, सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, महर्षी इन्स्ट्ीटय़ूटच्या ऑफ एज्युकेशन जपानचे टाकू कोबायाशी, डायसुके हागा आदी मान्यवर उपस्थित होते. हातोयामा म्हणाले, माङो वय 71 असून मी गेल्या तीस वर्षापासून ट्रान्सडेंटल मेडिटेशन सातत्याने करतो. या योगामुळे पंतप्रधान पदाची जबाबदारी मी सहज सांभाळू शकलो. व आजही उत्साही आहे. आयुष्यातील सर्व ताणतणाव दूर सारून आपल्या अंर्तमनात निर्माण होणारी उर्जाच आपल्याला यश मिळवून देते. आपल्या समोरची ही भावी पिढी आपल्या स्वत:सह आपला समाज, देश व संपूर्ण जगाला नक्कीच शांततामय बनवेल याबद्दल मला खात्री आहे, असा विश्वास व्यक्त केला. श्वेता जोंधळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या योगसाधनेमुळे यंदा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्याथ्र्याच्या वैयक्तीक गुणांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक विद्याथ्र्यामध्ये होणारा सकारत्मक बदलच हळूहऴू समाज परिवर्तन करेल. व सर्वत्र शांती नांदेल अशी आशा वैशाली जोंधळे यांनी व्यक्त केली.
योगाच्या माध्यमातून विश्वात शांती प्रस्थापित करायची आहे- युकिओ हातोयामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 8:12 PM