ठाणे : येत्या २४ फेब्रुवारीला ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानावर युवासेनेचे कार्यध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकार्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्याचे शहरभर बॅनर ही लागले आहेत.
शनिवारी २४ फेब्रुवारी ला सायंकाळी ४ वाजता ठाणे शहरात युवासेनेचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील वर्तकनगर येथील रेमंड कपंनीच्या मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याची शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.याकरिता शहरभर होल्डिंगज आणि बॅनर ही झळकले आहेत. या होल्डिंगजच्या च्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना ही डिवचण्यात आले आहे. ठाणे काय वरळीतून लढून जिंकून दाखवू असा त्यावर उल्लेख आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीत युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन करणार आहे. मेळाव्याच्या शेवटच्या टप्प्यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला राज्यभरातील युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकते सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ठाकरे गटाला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.तसेच यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार योगेश कदम, आणि नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांचेही युवा मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आणि कसोटीपट्टू अजिंक्य रहाणे यांना शिवगौरव पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने नुकताच संसदरत्नपुरस्कार मिळालेले कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे प्रकट मुलाखत गायक संगीतकार अवधूत गुप्ते हे घेणार आहे.