शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

झेडपीत दीड कोटीचा घपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:07 PM

निकृष्ट बारकोड यंत्रणेची पाचपट दराने खरेदी, आता पडली धूळखात

- हितेन नाईक।पालघर : या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या नोंदणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या पेपरलेस बारकोड साहित्याची बाजारभावापेक्षा पाचपट दराने खरेदी करून सुमारे दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला असून हे साहित्य सध्या धूळखात पडून असतांना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कॅफो यांनी त्याचा दर्जा चांगला असल्याचे सर्टीफिकेट ही देऊन टाकले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा कडून ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या नोंदणीसाठी पेपरलेस बारकोड कार्ड अ‍ॅन्ड टोकन सिस्टीम, लॅमिनेशन मशीन, पाऊच, पेपर रोल, टेबल टॉप स्कॅनर, बारकोड स्कॅनर, बारकोड प्रिंटर आदी साहित्य खरेदी करून कार्यान्वित करण्यासाठी उपसंचालक आरोग्यसेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्याकडून ई - निविदा प्रक्रि या राबवली होती. त्यानुसार नुओव्ही फार्मास्युटिकल, घाटकोपर ह्या निविदाधारकास प्रति मशीन व सोबतच्या साहित्यसाठी सुमारे ३ लाख २९ हजार ३१३ रु पये इतक्या खर्चाच्या निविदेस मंजुरी देऊन एकूण १ कोटी ४८ लाख १९ हजार ८५ रुपयांच्या साहित्याची खरेदी करण्यात आली.या साहित्याचे वाटप १२ मार्च २०१७ रोजी करण्यात आले. जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, मोखाडा ४, विक्रमगड ३, डहाणू ९, वाडा ४, वसई ८, पालघर १० आणि तलासरी ४ अशा एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्राला वरील पेपरलेस बारकोड मशीन व इतर साहित्य १२ मार्च २०१७ ला मिळाल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकाºयाने कळविले आहे. परंतु हे बारकोड मशीन पुरवठा करून १ वर्ष ७ महिन्याचा कालावधी उलटून गेल्या नंतरही हे सर्व साहित्य आजही धूळखात पडून आहेत.जिल्हापरिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गैरव्यवहारा सोबत पेपरलेस बारकोड खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी उपस्थित करून तिसºया भ्रष्टाचाराचे प्रकरण उचलून धरले. यापूर्वी त्यांनी अनुकंपा आणि शिपाई भरती गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढली होती. पेपरलेस बारकोड मशीन खरेदी प्रकरणातील साहित्याची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करण्यात आली असून आजच्या बाजारातील मूळ किमती पेक्षा पाच पट रक्कम फुगवून लावण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मूळ मशीन सह अन्य सहा वस्तूंचे वेगवेगळे दर नमूद करण्या ऐवजी सातही वस्तूंची एकच ३ लाख २९ हजार ३१३ रुपये किंमत ठेकेदाराने लावून हेतू पुरस्सर आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनातून हा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून जिल्ह्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रातून पेपरलेस बारकोडचे कामकाज सुरू झालेले नसतांना ह्या मशीनचा दर्जा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र जिप चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) संजय पतंगे व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी देऊन टाकल्याने ठेकेदाराला सर्व रक्कम अदाही करण्यात आलेली आहे.पूर्वतयारी नसतानाच महागडी केली खरेदीजिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे ह्यांनी स्वत: पालघर, तलासरी आणि डहाणू ह्या तीन तालुक्यातील काही आरोग्य केंद्राना भेटी दिल्या असता पेपरलेस मशिनचे काम सुरू नसल्याचे त्यांना आढळून आले आहे.त्यामुळे कोणतीही प्राथमिक पूर्व तयारी न करता, घिसाडघाई करून खुल्या बाजार भावाची कुठलीही शहानिशा न करता चढ्याभावाने हे साहित्य खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.आजवर उघडकीस आलेल्या घोटाळ्यांवर कारवाई झालेली आहे. त्यामुळे आता या घपल्याची चौकशी होते व तिच्यावर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.हे गंभीर प्रकरण असून हव्या त्या दराने पुरवठा करण्यात आला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ह्याची गंभीर दखल घ्यावी असे पत्र दिले आहे. -विजय खरपडे, अध्यक्ष, जिपह्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला असून उच्चस्तरीय चौकशी व्हावी.- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष

टॅग्स :fraudधोकेबाजीpalgharपालघर