ठाणे - रेल्वे स्टेशन येथे लावलेला एक बॅनर चोरून तो ज्वेलर्स शॉपच्या समोर लाऊन दीवसा ढवळया दरोडा टाकणारा दरोडेखोर विनोद रामबली सिंग वय 49 याच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्या कडून पोलिसांनी 2करोड 61 लाख रूपयाचा माल जप्त केला. त्याच्या बरोबर त्याचा साथीदार छबिलदास पारस जो स्वतःहाला दलाल म्हणवतो त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
सात ते आठ किलो सोन लुटले होते त्यातील साडे सहा किलो सोने जप्त केले आहे. सिंग हा वीस वर्षापासून दरोडे टाकण्याचे काम करत होता त्याने आतापर्यांत इतर राज्यात बरेच दरोडे टाकले आहेत.
दरोडे टाकणाच्या अगोदर तो पंधरा दिवस त्या ज्वेलरी शॉपची रेकी करत होता. दुकानाचे मालक कधी दुकान बंद करतात कधी उघडतात यावर तो बारीक लक्ष ठेवत असे ,त्या नंतर दुपारी तो दरोडा घालत असे .